यावेळी पुढे बोलताना विनोद घुगे साहेब म्हणाले की, सावंत कुटुंब समाजकारणातून राजकारणाचा यशस्वी वारसा जपत असून कै. सुभाष आण्णा सावंत एक चालते बोलते न्यायालय होते . अनेक कुटुंबांना उध्वस्त होण्यापासून वाचवुन कौटुंबिक सलोखा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा वारसा यशस्वीपणे सावंत कुटुंब प्रमुख विठ्ठल आप्पा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संजय आण्णा सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. राहुल सावंत, पै. सुनील बापू सावंत यशस्वीपणे चालवत आहेत. छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हे एक शिस्तप्रिय मंडळ असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या कामाची आपण नक्कीच दखल घेऊन त्यांचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे गणेश मंडळ सामाजिक उपक्रमाबरोबर मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बी, लेझर फोकस , वेळेचे बंधन , काही गैरवर्तन करणाऱ्या मंडळांना योग्य शासन करणार आहे. व जे मंडळ शिस्तीचे व नियमाचे पालन करून समाज उपयोगी उपक्रम, पारंपरिक कार्यक्रम राबवुन शिस्तबध्द मिरवणूक गणेशोत्सव आणि देखावा साजरा करेल अशा मंडळांची दखल आपण घेणार असून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून बक्षीस दिले जाणार आहे. हे बक्षीस याच वर्षी एका महिन्याच्या आत देणार असल्याचे विनोद घुगे साहेबांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात झालेल्या लिंबू चमचा, संगीत खुर्ची आणि धावण्याच्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या राजनंदिनी सावंत, साक्षी क्षीरसागर, जान्हवी सावंत, गौरी सामसे, भक्ती हवालदार, काव्या टिळेकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यासाठी इचलकरंजी येथील संतोष कुंभार, विनोद कुंभार, अमोल कुंभार यांनी हे या देखाव्याचे मूर्तीकार असून छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे सदस्य रामभाऊ क्षीरसागर, मार्तंड सुरवसे, पांडुरंग सावंत, बंडू नलवडे, संदिप उबाळे, पांडूरंग पवार, अजिनाथ वीर, रमेश मोरे, विलास मुसळे, बाप्पू उबाळे, सुनिल अंधारे, विशाल पवार, नागेश उबाळे, दत्ता कांबळे, सागर सामसे, सागर वीर, भुषण सुरवसे, नितिन माने, गणेश सावळकर, आल्ताफ दारुवाले, राहुल तपसे, आनंद रोडे, मजहर नालबंद, अभिषेक खारगे, हाजी उस्मान सय्यद, पप्पु सुर्यवंशी, अमोल मोरे, गोरख आगम, सौरभ काकडे, गणेश किरवे, सागर नलवडे, दिनेश सावंत, सुरेश सामसे, गणेश माळी, शुभम कोंगे, लखन उबाळे, आनंता काकडे, जय बीडकर, अरुण खुळे, दिपक मुसळे, शुभम चांदगुडे, औदुंबर उबाळे, , रवी सुरवसे, नागेश सुर्यवंशी, मधुकर दिक्षीत, रौफ शेख, शकिल शेख, महेश अंधारे,कोंगे, लखन उबाळे, आनंता काकडे, जय बीडकर, अरुण खुळे, दिपक मुसळे, शुभम चांदगुडे, औदुंबर उबाळे, महेश भागवत, महेश वीर, रवी सुरवसे, नागेश सुर्यवंशी, मधुकर दिक्षीत, रौफ शेख, शकिल शेख, महेश अंधारे, पप्पु रंधवे, युवराज शिंदे, सुदर्शन मोरे यांच्यासह माही डेकोरेशनचे मंगेश गोडसे यांनी सजावटीसाठी परीश्रम घेतले तर बाळासाहेब वाघ यांनी स्टेज बांधणी आणि पोथरे येथील शनैश्वर मंडपचे दिलीप शिरगिरे यांनी मंडप, लाईट डेकोरेशनचे नियोजन केले.
पुढे बोलताना श्री. घुगे म्हणाले की, आपण काम करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम केले तर खऱ्या अर्थाने समाजाचे भले होणार आहे. त्यामुळे जीवन जगत असताना सामाजिकतेचे भान ठेवून काम केल्यास समाज नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जात धर्म पंथ याच्या पलीकडे मानवता हाच खरा धर्म असून समाधानी जीवन जगण्यासाठी सेवा भाव वृत्तीने काम केल्यास समाजाचे पाठबळ तुम्हाला नक्कीच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पै. सुनील बापू सावंत, स्वागत जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. राहुल सावंत यांनी केले तर आभार नगरसेवक संजय सावंत यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खारगे गुरुजी यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…