Categories: करमाळा

कुकडीच्या पाण्याने मांगी तलाव ओव्हरफ्लो… आमदार संजयमामा शिंदे यांचे मांगीसह पंचक्रोशीच्या वतीने आभार. सुजित तात्या बागल यांचे प्रतिपादन


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे आमदार झाल्यापासून मांगी तलावाकडे लक्ष आहे. मांगी तलावाला कुकडीचे पाणी कायमस्वरूपी मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच बंद पाईप मधून तलावाला पाणी देण्याचे सर्वेक्षणाचे आदेश ना.जयंत पाटील साहेबांच्या कडून आमदार शिंदे यांनी घेतले होते.या बाबीवरतीच समाधान न मानता आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्पाचे करमाळा तालुक्याचे हक्काचे पाणी उजनी धरणात सोडावे व तिथून कुकडी उजनी उपसा सिंचन योजना टप्पा 1 आणि टप्पा 2 या माध्यमातून ते पाणी लाभक्षेत्रातील चाळीस गावाच्या 24 हजार हेक्टर क्षेत्राला देण्याचे धोरण आखले. हे धोरण आखत असतानाच टप्पा 2 वरून मांगी तलावाला पाणी देण्याचे नियोजनही आ. संजयमामा शिंदे यांनी आखले.
गतवर्षी दुष्काळामुळे मांगी आणि पंचक्रोशी यांना फटका बसलेला होता. याची दखल घेऊन आ.संजयमामा शिंदे यांनी यावर्षी कुकडी प्रकल्पामध्ये चांगले पर्जन्यमान होत असताना 26 जुलै 2024 रोजी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळ यांच्याकडे ओव्हरफ्लो चे पाणी मांगी तलावत सोडण्याची मागणी सर्वप्रथम केली आणि त्यानुसार जुलैमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे 16 सप्टेंबर 2024 अखेर मांगी तलाव ओहर फ्लो होत आहे.आमदार संजयमामा शिंदे यांचे हे ऋण मांगी गावासह या तलावाच्या पाण्याच्या उजव्या आणि डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील जनता कधीही विसरणार नाही .

चौकट-
मांगीच्या डाव्या व उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर…
एस.के.अवताडे
उपअभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. 12. यांत्रिकी विभागाकडून करमाळा पाटबंधारे विभागाला मशिनरी उपलब्ध झाल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून मांगी तलावाच्या उजवा आणि डावा या दोन्ही कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मांगी तलावाच्या लाभक्षेत्रातील गावांच्या मागणीनुसार या दोन्ही कालव्याला पाणी देण्याचे नियोजन आखलेले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago