करमाळा प्रतिनिधी – मांगी तलावात कुकडी ओव्हरफ्लो चे पाणी यावे अशी आग्रही मागणी करत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याकडे केली होती व त्याचा पाठपुरावा देखील वेळोवेळी केला होता. त्याचाच परिणाम म्हणून मांगी तलाव आज भरला आहे.
मा जिल्हाधिकारी यांनी देखील दिग्विजय बागल यांच्याच मागणी पत्राचा संदर्भ देत कुकडी पाटबंधारे मंडळा कडे तलाव भरण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी असून आता पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे.
+++++++
गतवर्षी पाण्याची टंचाई होती यावर्षी मात्र कुकडी लाभक्षेत्रात पाऊस पडत असताना इकडे मात्र तुलनेत पाऊस कमी असताना दिग्विजय बागल यांनी विशेष पाठपुरावा करत मांगी तलावात ओव्हरफ्लो च्या पाण्याची मागणी करत सरकार कडून ती पूर्ण करुन घेतली स्व दिगंबरराव बागल मामा यांच्यानंतर दिग्विजय बागल यांच्या पाठपुराव्यामुळे २०२२ व २०२४. असा दोनदा हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानन्यात आले.
मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी दिग्विजय बागल आणि रश्मी दिदी बागल यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू असून या सरकारच्या माध्यमातून लवकरच ते पूर्ण होतील अशी आशा आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…