करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहराला अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह सर्व विभाग प्रमुखांची बैठक आज घेतली .करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे यावरती कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच आवश्यक निधी आपण उपलब्ध करून देऊ असे आ.संजयमामा शिंदे यांनी यावेळी सांगितले.
करमाळा नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९३ साली सुरू झालेल्या योजनेसाठी दहीगाव येथून पाणी उपसा करणारे २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीच्या विद्युतपंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणे,शहरातील मारवाड गल्ली, राशीन पेठ, सिध्दार्थ नगर, भिमनगर, किल्ला वेस, मेन रोड, श्री कृष्णाजी नगर याभागात सन १९९८ साली CI पाईप लाईन टाकलेल्या आहेत. तरी या पाईप लाईन कालबाह्य झालेले आहेत. शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही व वारंवार तक्रारी येत आहेत. त्याकरिता सदरील पाईप लाईन DI किंवा HDEP या बदलने ,शहरांतर्गत स्वच्छता करणे, शहर विकास आराखडा मंजूर करून घेणे यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
या बैठकीसाठी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचीन तपसे,आकाश वाघमारे बांधकाम अभियंता, समीर नदाफ लेखापाल, शशांक भोसले नगर अभियंता, विनोद राखुंडे अंतर्गत लेखा परीक्षक, पियुष शिंपी आस्थापना प्रमुख, कमलाकर भोज, पाणीपुरवठा विभाग हे उपस्थित होते.
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…