Categories: करमाळा

राजस्थान उत्तरप्रदेशच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांना शासन दरबारी न्याय मिळवून देणार ‌- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी राजस्थान उत्तरप्रदेश राज्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संपादकांना शासन दरबार ‌मान्यता देऊन न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे मत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचेवतीने आमदार संजयमामा शिंदे यांना ‌ डिजिटल मीडिया पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना मागण्यासंदर्भात विविध मागण्यांचे ‌ निवेदन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या आदेशानुसार संघटनेचेवतीने निवेदन देण्यात आले. .यावेळी डिजिटल करमाळा तालुका डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके ‘उपाध्यक्ष शितल कुमार मोटे सचिव नरेंद्र सिंह ठाकुर सहसचिव सूर्यकांत होनप हर्षवर्धन गाडे,तुषार जाधव, संघटक अंगद भांडवलकर खजिनदार एडवोकेट सचिन हिरडे राजू सय्यद, राहुल रामदासी, सागर गायकवाड उपस्थित होते. करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की राज्यातील महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीपासून शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, बांधकाम कामगार, शिक्षक, शासकिय, निमशासकिय कर्मचारी अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी आपण अनेक योजना राबविल्या असून सर्वांना न्याय दिला आहे. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार दुर्लक्षित राहीला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. महानगरातील झोपडपट्ट्या व उच्चभूवर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे. देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनीही दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून तिथल्या डिजिटल मिडियाला आधार दिला. राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धतीवर त्यापेक्षाहो व्यापक धोरण युध्दपातळीवर आपण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २० हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे. करमाळा तालुक्याचे आमदार म्हणून पत्रकाराच्या कल्याणासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडवणिस यांच्याकडे पाठपुरावा करुन आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना पाठबळ देवून आधार व न्याय द्यावा, ही अशी मागणी केली आहे. यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत डिजिटल मीडिया पत्रकार धोरणाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत धोरण निश्चित करण्याचे काम चालू आहे. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या भावना लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे पोहोचवणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून आपणास .न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago