Categories: करमाळा

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पशुसंवर्धन विभागातील 18 कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार निघणार-महेश चिवटे

करमाळा (प्रतिनिधी )
पशुसंवर्धन विभागातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या अंशकालीन 18 कर्मचाऱ्यांचा गेली आठ महिन्यापासून पगार रखडला होता.या प्रश्नासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला.
यावेळी गुरुवारपर्यंत सर्व 18 कर्मचाऱ्यांचा पगार करमाळा पंचायत समिती कडे वर्ग करू अशी आश्वासन कुलदीप जंगम यांनी दिले
या शिष्टमंडळात एम ए बाराव,ए एफ तांबोळी एस व्ही गोरे एस एस सावंत आर टी शिंदे व्ही एल पाटील वारजे बीबी पवार बी एन चोपडे बीएमजी शेख एनडी शेख असे 18 कर्मचारी समाविष्ट होते.

यावेळी बोलताना पशुसंवर्धन अंशकालीन कर्मचारी बाप्पा चोपडे म्हणाले की गेली आठ महिन्यापासून आमचा पगार थकला होता आम्ही वारंवार आणि पुढाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे मारले पण थकलेला पगार मिळाला नाही.जिल्हाप्रमुख चिवटे यांची सोलापूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी करमाळा येथे भेट घेऊन या संदर्भात आमची कैफियत मांडली.या प्रकरणाचा त्यांनी तात्काळ पाठपुरावा करून आमचा थकीत पगार मिळवून देण्याची आशा पल्लवीत केली आहे.हा पगार मिळाल्यानंतर आमचा दसरा आणि दिवाळी सुखात जाणार आहे.तातडीने निर्णय घेऊन प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे अंशकालीन पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.या अंशकालीन कर्मचाऱ्यांना 24 तास काम करून केवळ 60 टक्के पगार दिला जातो हा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून या सर्व कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतनवादी द्यावी याचाही प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी तयार करून शासनास पाठवण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेहा प्रस्ताव सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावून 24 तास काम करणाऱ्यांना उर्वरित 40 टक्के पगार वाढ देतील असा विश्वास महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago