Categories: करमाळा

मराठा समाजाच्या आरक्षणाची मागण्या मान्य करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा 22 सप्टेंबरला करमाळा बंदचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून 22 सप्टेंबरला करमाळा बंदचे आवाहन सकल मराठा समाज बहुजन समाज यांच्यावतीने करण्यात आले आहे . याबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने‌ असे म्हटले आहे की मराठा संघर्षयोद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असून श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत त्या तात्काळ मंजूर करून घ्याव्यात जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असेल संघर्षयोद्धा श्री जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व बहुजन समाज करमाळा च्या वतीने करमाळा शहर व तालुका बंद चे आवाहन करण्यात येत आहे उद्या रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी करमाळा बंद चे आवाहन करण्यात आले आहे.सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा शहर व तालुका यांना सुचित करण्यात येते की उद्या 22 सप्टेंबर रोजीसकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

3 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

3 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

17 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

18 hours ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

18 hours ago

सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन ‌ जगावे-डाॅ.गजानन गुंजकर

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या ‌युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन ‌ वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…

2 days ago