Categories: Uncategorized

अंतरवाली सराटी येथे प्राध्यापक रामदास झोळ सरांनी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिली भेट सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढावा


करमाळा प्रतिनिधीः गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा. असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी केले. मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला साठी आरक्षण मिळावे. यासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे. त्या ठिकाणी शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी आंतरवाली सराटी येथे प्रयत्न जाऊन मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला, बसायला सुध्दा त्राण उरला नाही.. मनं सुन्न झालं ! मराठा समाजाच्या लेकरांच भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला. मनोजदादा आपण काळजी घ्या; आपली समाजाला गरज आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती प्रा रामदास झोळसर यांनी केली आहे. अंतरवाली सराटीला येथे भेटीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते गणेश मंगवडे,प्रशांत नाईकनवरे तसेच प्रा. संजय जगताप, सागर सरडे व नागेश चव्हाण, प्रशांत नाईकनवरे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

29 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago