करमाळा (प्रतिनिधी )
करमाळा हिवरवाडी रस्ता गेली 25 वर्षापासून दूर अवस्थेत होता या रस्त्यासाठी 300 लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रास्ता रोको आंदोलन केले.बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे आमरण उपोषण केले. लोकसभेच्या प्रचाराला आलेल्या उमेदवारांच्या गाड्या अडवल्यापण कुठल्या तालुक्यातील पुढाऱ्यांनी दखल घेतली नाही .मात्र या विद्यार्थ्यांची हाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐकून या रस्त्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केला व आज या रस्त्याचे काम सुरू झाले आहे असे स्पष्ट मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले. करमाळा हिवरवाडी रस्त्याचे आज भूमिपूजन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे ‘भोसेचे माजी सरपंच भोजराज सुरवसे ;हिवरवाडी चे सरपंच दत्तू इरकर माजी सरपंच ज्ञानदेव इरकर बाळासाहेब पवार चतुर्भुज इरकर ;बाळासाहेब सुरवसे,विलास रोडगे,रघुनाथ काळे गणेश ईवरेरे, ज्ञानदेव ईवरे
नंदू इरकर शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील आधी सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते .
उपस्थितांचे स्वागत हिवरवाडी चे ग्रामपंचायत सदस्य जयराज चिवटे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांनी केले
++++
यावेळी बोलताना रमेश कांबळे म्हणाले की
या रस्त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलने केली. मात्र आम्हाला कोणत्याही नेते मंडळींनी न्याय दिला नाही मात्र आज जिल्हा नियोजन मंडळातून महेश चिवटे यांनी तब्बल पन्नास लाखाचा निधी देऊन हा रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे. याबद्दल हिवरवाडी भोसे वडगाव या परिसरातील ग्रामस्थ शिवसेनेचे आभारी आहे .
++++गावाला रस्ता नसल्यामुळे एसटी येत नव्हती आता जिल्हाप्रमुखांनी आमच्या गावाला एसटी सुरू करून द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल त्यासाठी शिवसेनेने प्रयत्न करावे असे आवाहन रघुनाथ काळे यांनी केले आहे.*****भोजराज सुरवसे
या रस्त्याचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी अजून 30 लाख रुपयांचा निधी गरज असून हा निधी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावा त्यासाठी जिल्हाप्रमुख महेश चिवटे शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे असे आवाहन भोसे गावचे माजी सरपंच भोजराज सुरवसे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…