Categories: करमाळा

जेऊर रेल्वे स्थानकावर लोडींग अनलोडींग पार्सल सुविधा सुरू करा. दिग्विजय बागल यांनी केली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

करमाळा प्रतिनिधी 
जेऊर रेल्वेस्थानकावर पार्सल सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की ग्रामीण

भागातील सर्वात जास्त प्रवासी उत्पन्नही असलेले जेऊर रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा करमाळा,जामखेड,परंडा या तीन तालुक्यातील नागरीकांचा संपर्क आहे.त्यामुळे येथील शेतकरी,व्यापारी आणि यांची सोय व्हावी यासाठी लोडिंग-अनलोडिंग पार्सलची सुविधा सुरू करने आवश्यक आहे.
दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जेऊर स्थानक सुलभ व सोयीचे असल्यामुळे येथून नागरीक प्रवास करतात.                    येथील नागरिकांची,व्यापाऱ्यांची,शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून या स्थानकावर पार्सल सुविधा ऑफिस चालू करणे गरजेचे आहे.पार्सल ऑफीस सुरू झाल्यास तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचाभाजीपाला,फळे,दूध,अंडी, मासळीवतसेच व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे सामान फ्रीज, टीव्ही, कुलर, टू व्हीलर, सायकल तसेच विविध प्रकारचे छोटे- मोठे सामान व वस्तू सोलापूर, कुडूवाडी, दौंड, मिरज, पंढरपूर, लातूर, पुणे, लोणावळा, कल्याण, मुंबई, अशा अनेक शहरांच्या ठिकाणी साहित्य पाठविणे शक्य आहे. पार्सल सुविधा सुरू झाल्यास येथील नागरिकांची सोय होऊन रेल्वे प्रशासनाला उत्पन्नही मिळणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

20 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago