Categories: करमाळा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड राहुल सावंत यांची कन्या चिमुकली जान्हवी सावंतच्या कलेक्टर होणार जिद्दीचे केले कौतुक

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील झरे येथे झालेल्या जनसमान यात्रेनिमित्त नामदार ‌ अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत ‌ भव्य ‌ शेतकरी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता ‌ या जनसंमान यात्रेनिमित्त जिल्हा नियोजन समिती सदस्य एडवोकेट राहुल सावंत यांची कन्या कु. जान्हवी राहुल सावंत हिने दादाला हस्तांदोलन करून लाडकी बहीण योजना चांगली सुरू केली असून ‌ यामुळे महिला जाम खुश आहेत. अशी भावना ‌ नामदार अजित दादा पवार ‌ यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर ‌ अजित दादा पवार म्हणाले की तू खुश आहे ना त्यावरती म्हणाली हो मी खुश आहे ‌. बाळापुढे कोण व्हायचे ठरवले आहे ‌ त्यावर जान्हवी सावंत हिने मी कलेक्टर होणार असल्याचे सांगितले. तिच्या या उत्तरामुळे ‌ अजित दादा मिस्कीलपणे हसून म्हणाले मुलगी लय जिद्दी आहे तिने तिने आत्तापासूनच कलेक्टर व्हायचे ठरवले आहे हे नक्कीच कलेक्टर होऊन दाखवणार ‌ अशी जिद्द मुलांमध्ये ‌ निर्माण होणे गरजेचे असल्याचे नामदार अजित दादा पवार यांनी सांगितले. यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोगा अध्यक्ष रूपालीताई चाकणकर एडवोकेट राहुल सावंत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी महिला नागरिक उपस्थित होते. सर्वांनी टाळ्या वाजून जान्हवी सावंत हिचे कौतुक केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

21 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago