आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी 3000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांना निवडून आणा अधिक भरगच्च निधी तालुक्याचा विकास कामासाठी देऊ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
यावेळी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा व प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन तर रस्ते कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, उप अभियंता कुंडलिक उबाळे, तहसिलदार शिल्पा ठोकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य तानाजी बापू झोळ, चंद्रकांत काका सरडे , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव दादा माळी, वामनदादा बदे , विलास दादा पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड राहुल सावंत,जिल्हा अध्यक्ष अभिषेक आव्हाड ,जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार तालुका प्रवक्ते ॲड अजित विघ्ने कार्याध्यक्ष सुजित बागल ,राजेंद्र बारकुंड,डॉक्टर गोरख गुळवे संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर विकास वीर , प्रवीण शिंदे गुरुजी अन्य मान्यवर उपस्थित होते. सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे. उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करमाळा येथे करण्यात आले.
तसेच करमाळा शहरातील विविध उपविभागीय कार्यालय तसेच तालुकास्तरीय कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता होती. या इमारतीसाठी 34 कोटी 68 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन ही पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. त्याप्रमाणेच रस्ते विकास महामंडळ अंतर्गत हॅम (HAM)सावडी जिल्हा हद तालुका करमाळा ते वेणेगाव तालुका माढा या 71 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी 271 कोटी 55 लाखाचा निधी मंजूर असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघातील असंख्य महिला गुलाबी कलरच्या फेटा घालून सभास्थळी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी सरपंच असंख्य उपस्थित होते.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…