करमाळा (प्रतिनिधी
शहराच्या मध्यवस्तीत सर्व जनतेला सोयीस्कर असलेली जागा उपलब्ध असताना व न्यायालय सह सर्व शासकीय कार्यालय जवळपास असणारी मध्यवस्तीतील जागा सोडून गावाबाहेर नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्याचा प्रशासनाचा इरादा नागरिकांना मान्य नाही केवळ आमदार संजय मामा शिंदे यांच्या हट्टपायी ही इमारत शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे याला आमचा तीव्र विरोध असून कसल्याही परिस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारत शहराच्या बाहेर बांधू देणार नाही वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन उभा करू असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे घाईघाईत करमाळा तालुक्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
#####
शेवट जनतेचे मत महत्वाचे असून
संपूर्ण करमाळा तालुक्यातील जनता हे नवीन प्रशासकीय इमारत आहे त्या ठिकाणीच व्हावी अशी मागणी करत आहे असे असताना प्रशासन मात्र जागा अपुरी आहे असे कारण दाखवून तहसील कार्यालय व प्रशासकीय इमारत गावाबाहेर नेण्याचा अट्टाहास करत आहेत
अजून या कामाचे टेंडर झालेले नाही तरीसुद्धा अजित पवार यांनी मी काम केले असं दाखवण्यासाठी केलेले भूमिपूजन हास्यस्पद आहे.याबाबत आम्ही तहसीलदार ठोकडे यांच्याशी चर्चा केली असून नवीन जागेचा प्रस्ताव देत आहोत.
महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
#####
या इमारतीसाठी अडीच एकर जागा लागते ही जागा जवळपास उपलब्ध झाले तर जागेचा प्रस्ताव बदलून देऊ
जनतेचे मत विचारत घेऊ
शिल्पा ठोकडे तहसीलदार करमाळा
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…