पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार माननीय प्रा.जयंत आसगावकर साहेब हे करमाळा,माढा,बार्शी तालुक्यातील अनुदानित शाळांना त्यांच्या आमदार फंडातून प्रिंटर व संगणक वितरण समारंभासाठी *जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे* तालुका करमाळा येथे दिनांक 27/09/2024 रोजी दुपारी दोन वाजता उपस्थित राहणार आहेत.सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षण संस्था संघटना सोलापूर विद्यापीठाचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले उपस्थित राहणार आहेत. सदरची माहिती करमाळा तालुका स्वयंअर्थ शाळा संघटनेचे संस्थेचे सचिव जयंत दळवी यांनी दिली आहे.यावेळी करमाळा तालुक्यातील स्वयंअर्थ शाळांच्या प्रश्नांविषयी संघटनेचे पदाधिकारी नितीन भोगे, ब्रिजेश बारकुंड,संदिपान गुटाळ, अमोल दुरंगे, तानाजीराव करचे व सर्व संस्थाचालकांच्या समवेत माननीय आमदार आसगावकर साहेब यांच्याशी चर्चा करणार आहेत.
तरी तालुक्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित तसेच स्वयंअर्थ संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्यांनी उपस्थित रहावे असे अहवान श्री भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळा चे सचिव श्री युवराज बिले यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…