करमाळा शहरात तात्काळ साथीचे रोगांचे थैमान थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी: अतुल फंड

करमाळा प्रतिनिधी  .करमाळा शहरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान मांडले असून सध्या करमाळा शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे करमाळा शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना या त्रासाला खूप सामोरे जावे लागत आहे या बाबीकडे करमाळा नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे संबंधित नगरपालिकेतील प्रशासकीययंत्रणेला मी सांगू इच्छितो करमाळा तालुक्यातील दवाखान्यांची परिस्थिती बघितली तर एकही दवाखाना मोकळा दिसत नाही. प्रत्येक दवाखाने गच्च झालेत अक्षरशा तिथे उभा राहण्यास जागा नाही एवढे डेंगू चिकनगुनिया मलेरिया थंडी ताप अशा आजारांनी त्रस्त झालेली करमाळ्यातली सर्वसामान्य जनता दिसून येत आहे आणि याचा आर्थिक ताणही सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहेत करमाळा शहरांमध्ये बऱ्यापैकी गटारी उघड्याच आहेत त्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी शहरांमध्ये पसरलेली आहे यावर प्राथमिक उपचार म्हणून प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे त्या तात्काळ करून घ्याव्यात अन्यथा करमाळा शहरातील सर्वांना एकत्रित करून नगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात येईल ही दखल करमाळा नगरपालिका प्रशासनाने घ्यावी अशी मागणी नगरसेवक अतुल फंड यांनी केली आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

6 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago