Categories: करमाळा

जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस (इंटक) ची कार्यकारणी बैठक व पदाधिकाऱ्यांची निवडी संपन्न

करमाळा प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटक अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज दिनांक 29 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह करमाळा येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी- शिवाजी सेनसाखळे, सचिव- नवनाथ दत्तात्रय काळे, सहसचिव- अविनाश किसन मोरे, कोषाध्यक्ष- सिद्दाराम भीमराव कोळी, संघटक- शंकर शिवयोगी लोभे, महिला कामगार अध्यक्ष- सुजाता राजकुमार वाघमारे, महिला कामगार उपाध्यक्ष- मंगल लहूदास वाघमारे, मीडिया प्रमुख- राजू तैमूर सय्यद, सोशलमीडिया प्रमुख- अजीम शेख फरीद शेख, युवा जिल्हाध्यक्ष- नागसेन ज्ञानदेव डूरके, सदस्य- अविनाश दिलीप वाघमारे, चंद्रकांत नारायण कांबळे, संजय येताळ अवचर, भिमराव माणिकराव नाळे व करमाळा बांधकाम कामगार शहराध्यक्ष चेतन जयराज आव्हाड तसेच करमाळा बांधकाम कामगार शहर उपाध्यक्ष पदी संजय रामचंद्र कुकडे यांची निवड जिल्हाध्यक्ष अमोल जाधव व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक व पदाधिकाऱ्यांचे निवडी च्या या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र जगताप, महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे हे उपस्थित होते.

यावेळी शंकर लोभे यांनी सूत्रसंचालन केले तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी काँग्रेस इंटकचे महत्त्व व धोरणे समजावून सांगितले व दहा वर्षे झाली सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस इंटक कोणालाही माहीत नव्हते तर जे होते त्यांनी फक्त नावा पुरते पदे घेऊन ठेवली पण अमोल जाधव यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा एका महिन्यात पिंजून काढला व पदाधिकाऱ्यांची निवडी करून त्यांना काँग्रेस इंटकचे धोरणे व लक्षणे समजावून सांगितले.

महिलांनी लोकांच्या हाताखाली कामनकरता स्वतः उद्यमी व्हावे व आम्ही महिलांचे न्याय हक्कासाठी तत्पर राहू तसेच काँग्रेस इंटकच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त महिलांना स्वतः व्यावसायिक होता येईल याचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असे आश्वासन महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे व पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे यांनी केले.

यावेळी आप्पा कांबळे, विक्रम साळवे, बंटी पवार, कुणाल चवरे, दत्तात्रय आलाट, अजिनाथ आलाट, भाऊसाहेब भोसले, हर्षद गुळवे, राजाभाऊ मोहोळकर, आदित्य जाधव, रोहन परदेशी, अनिकेत कांबळे, मनोज ताकतोडे, तन्मय भिताडे, गणेश झिंजाडे, राज शेख, संतोष गोरे, पिंटू मोरे, नागेश चव्हाण, विजय गायकवाड, सार्थक उबाळे, नागेश पवार, इत्यादी काँग्रेस इंटक चे कार्यकर्ते उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

1 day ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

1 day ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

2 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago