करमाळा प्रतिनिधी
करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून या संदर्भात आरोग्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही आपण पाठपुरावा केलेला होता. त्यानुसार बदली प्रक्रियेमध्ये करमाळा तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील डॉ.अंकुश भाऊराव पवार यांची कायमस्वरूपी भूलतज्ञ म्हणून नियुक्ती झालेली असून ते हजर झाल्यानंतर येतील सिझेरियन व इतर शस्त्रक्रियेसाठी २४ तास उपलब्ध राहतील अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,२०१९ ते २४ या कार्यकाळामध्ये पूर्णवेळ कायमस्वरूपी भुलतज्ञ करमाळा तालुक्यासाठी लाभला नसला तरीही हंगामी स्वरूपात, कंत्राटी भूलतज्ञ या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले त्यामधून जवळपास ७०० मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पार पडल्या. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेचे लाखो रुपये वाचले. तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा लाभावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून दवाखान्याचे श्रेणीवर्धन करून १०० खाटाच्या दवाखान्याचे बांधकाम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यातील २० बेड हे अतिदक्षता विभागाचे आहेत. याबरोबरच रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम वेगात सुरू असून करमाळा तालुका आरोग्य विषयक सुविधांनी संपन्न करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…