Categories: करमाळा

मकाई कारखाना सभासदांच्या मालकीचा असून विश्वस्त या नात्याने आम्ही भूमिका बजावत असुन आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे येत्या काही काळात मकाई पुनर्वैभव प्राप्त करेल-सौ. रश्मी दिदी बागल

करमाळा – (प्रतिनिधी) मकाई कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून आम्ही केवळ विश्वस्त या नात्याने भूमिका बजावत असुन आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे येत्या काही काळात आपणा सर्वांच्या सहकार्याने मकाई पुनर्वैभव प्राप्त करेल असा विश्वास आज भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका माननीय रश्मी बागल यांनी येथे व्यक्त केला. लोकनेते व राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांनी मकाईच्या रूपान एक वारसा परंपरा आपणा सर्वांचे हातात जतन करण्यासाठी दिला आहे. मकाईचं संरक्षण व संवर्धन करणे ही आमची प्रामुख्याने जबाबदारी आहे. श्री. मकाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आदिनाथ चे व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यानंतर मुख्य सभेला सुरुवात झाली प्रारंभी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले त्याला उपस्थित सर्व सभासदांनी दोन मिनिटे शांत उभे राहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका माननीय रश्मी बागल यांनी मकाई कारखान्याच्या एकूण कामकाजाचा आढावा घेत येत्या काही काळात मकाई कारखाना आपणा सभासदांच्या सहकार्याने निश्चितपणे पुनर्वैभव प्राप्त करेल हे रोपट स्वर्गीय मामांनी लावलेल आहे हा वारसा आणि परंपरा जतन करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्या सहित सर्वांची आहे. मकाईकडे जर कोणी राजकारणाच्या दृष्टीने मुद्दामहून टीका करून बदनाम करत असेल तर हे यापुढील काळात सहन केले जाणार नाही. त्याला जशास तसे पद्धतीने उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा देखील रश्मी बागल यांनी यावेळी दिला मकाईच्या प्रगतीसाठी प्रसंगी आम्ही आमची बागल कुटुंबाची प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे. आम्ही संस्था विकत नाही तर आम्ही संस्था प्रामाणिकपणे चालवण्याचा प्रयत्न करतो आमच्यावर स्वर्गीय मामांचे संस्कार आहेत. असाही टोला त्यांनी कोणाचे नाव न घेता यावेळी दिला कामगारांची देणी तोडणी वाहतूकदार व सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य राहणार असून मकाई कारखाना लवकरच पुनर्वैभव प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बागल कुटुंबीयांची बांधिलकी ही सभासदांचे कामगारांचे व तोडणी वाहतूकदारांचे हित जोपासण्याचीच आहे. मकाई मध्ये जर मुद्दाम कोणी राजकारण आणत असेल तर ते सहन केले जाणार नाही. असाही इशारा त्यांनी बोलताना दिला यावेळी विषय वाचन संस्थेचे चेअरमन दिनेश दादा भांडवलकर यांनी केले सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली त्यानंतर आभार प्रदर्शन संचालक कल्याण सरडे यांनी केले तर राष्ट्रगीत गायन व सभेचे सूत्रसंचालन माननीय रश्मी दीदी बागल यांचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर यांनी केले उपस्थितांचे स्वागत कार्यालईन अधिक्षक लहू बनसोडे यांनी केले.अंदाजे 45 मिनिटांमध्ये या सभेचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात झाले. यावेळी केरू गव्हाणे, संचालक बाळासाहेब भाऊ पांढरे, चेअरमन धनंजय डोंगरे, संचालक सतीश निळ, युवराज रोकडे, रेवननाथ निकत, गणेश झोळ, अजित झांजुर्णे, जयदीप देवकर वकील, अशोक बाप्पा पाटील, गणेश तळेकर, महेश तळेकर, बापू चोरमले ,अनिल अनारसे, विलास काटे, अनिल मामा शिंदे, रामचंद्र हाके, दिनकरराव सरडे, गोवर्धन करगळ, नवनाथ बागल, राजेंद्र मोहोळकर, आशिष गायकवाड,अमोल यादव,सचिन पिसाळ,संतोष पाटील,नंदू भोसले,प्रकाश पाटील,बापू कदम,विष्णू माने, आदी संचालकांसह मकाई चे सर्व विभाग प्रमुख कामगार संस्थेचे सभासद, पत्रकार मीडिया प्रतिनिधी, तोडणी वाहतूकदार आदी बहुसंख्येने उपस्थित होते. *चौकट करणे- आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भाजपाचे सोलापूर जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन माननीय दिग्विजय जी बागल यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन याचा विशेष ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला हा ठराव संचालक सतीश निळ यांनी मांडला तर त्याला अनुमोदन पोथरे येथील हरिश्चंद्र झिंजाडे व उपस्थित सर्व सभासदांनी एकमुखाने टाळ्यांच्या गजरात दिले.*

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

19 mins ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

10 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

24 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago