करमाळा प्रतिनिधी उजनी धरण १००% काटोकाठ भरलेले असताना नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे करमाळा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून प्रशासनात तात्काळ याबाबत योग्य ती कारवाई करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नगरपालिकेवर शिवसेना महिला आघाडी घागर मोर्चा काढील असा इशारा शहर प्रमुख कीर्ती स्वामी यांनी दिला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांना दिले आहे .यावेळी आरती स्वामी, जया दसंगे, उज्वला शिंदे, आरती सूर्यपुजारी, मंगेश सूर्यपुजारी, बबलू कुलकर्णी, उमेश वनारसे, विजय देशपांडे रमेश वायकर आदी नागरिक उपस्थित होते.विशेषता खडक पुरावर पाणी येत नाही. नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात.. बिलापोटी दिलेल्या रकमेचा वापर कशासाठी केला असा प्रश्नही महिलांनी उपस्थित केला आहे. केवळ पाणीपुरवठा सुरू करायचा नावाखाली रोज हजारो रुपयांची बिले नगरपालिकेतून वसूल केली जातात. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्याचप्रमाणे शहरात डेंगूची प्रचंड साथ पसरली असून डासाचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जंतुनाशके वापरली जात नाहीत. नगरपालिकेचे फॉगिंग मशिन बंद आहे तालुक्याचे आमदार व इतर लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. गेल्या वर्षी नियोजन मंडळातून पाईपलाईन दुरुस्तीसाठी १६ लाख रुपये ठेकेदाराला नगरपालिकेने आणलेली जंतुनाशक पावडर बोगस आहे. या सर्व प्रश्नांवर जनता संतप्त झाली असून आता शिवसेना आग्रही झाली आहे . लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी बांगडी मोर्चा काढला जाईल असा इशाराही दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…