Categories: करमाळा

करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मातेचा नवरात्र उत्सवाची सुरुवात आज सकाळी आठ वाजता मंदिर समितीचे सदस्य श्री राजेंद्र वाशिंबेकर व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापनेने झाली.यावेळी सर्व पंचायतन देवस्थान मध्ये घटस्थापना करण्यात आली यावेळी आई कमला भवानी मातेचा महा अभिषेक करण्यात आला. सुशील पुराणिक रविराज पुराणिक यांनी पौराहित्य केले.यावेळी आई कमला भवानी मातेला गुलाबी रंगाचा भरदारी शालू दागिने आकर्षक हार व फुले घालून मंदिराचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी पूजा मांडली. सनई चौघडे ,झांज, नगारा, संबळाच्या तालावर देवीची आरती झाली. सालाबाद प्रमाणे माही डेकोरेशनच्यावतीने  आई कमला भवानी मंदिर व परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे.यावेळी बापूराव पुजारी विजय पुजारी ओंकार पुजारी संदीप पुजारी सचिन सोरटे तुषार सोरटे किसन सोरटे तसेच सर्व मानकरी सेवेकरी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago