करमाळा प्रतिनिधी :बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी बालकामगार दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना राबवावी अशी मागणी महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा विधवा महिला सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की,महाराष्ट्रातील बाल कामगारांची संख्या अंदाजे 96916 इतकी आहे.ही संख्या लक्षणीय आहे.यामध्ये वीट भट्टी, हॉटेल, खडी फोडणे, ऊस तोड कामगार, बांधकामावर तसेच अन्य धोकादायक व्यवसायामध्ये ही लहान मुले काम करताना आढळून येतात.काही बालकामगारांचे बाल लैंगिक शोषणही होते ते उजेडात येत नाही बालकामगार (प्रतिबंध व विनियमन)अधिनियम 1986 कायद्यानुसार हा गुन्हा आहे.त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी बाल कामगार दाखवा आणि हजार रुपये मिळवा. ही योजना राबविल्यास बालकामगारांची झपाट्याने संख्या कमी होईल. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बालकामगार आढळून येतील त्या शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून ज्या व्यवसायिकाकडे बाल कामगार काम करताना आढळून आल्यास त्या व्यवसाय मालकाच्या बँक खात्यातून प्रति बाल कामगार एक हजार रुपयांपर्यंत दंड म्हणून शासनाच्या एका विशिष्ट खात्यामध्ये जमा करावेत. तसेच ज्या व्यक्तीने बाल कामगाराचा फोटो जिल्हाधिकारी, पोलीस,महिला व बाल कल्याण विकास अधिकारी ,सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांना बालक काम करत असतानाचा फोटो पाठवला आहे अशा व्यक्तीच्या खात्यामध्ये वरील रक्कम जमा करण्यात यावी. हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आपण आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये घ्यावा व महाराष्ट्र बालकामगार मुक्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी त्यांनी सत्ताधारी महायुतीचे व विरोधी पक्षाना केली.या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार,कामगार मंत्री सुरेश खाडे,महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे,राज्यपाल महाराष्ट्र राज्य,सभापती नीलम गोऱ्हे,खा. सुप्रिया सुळे, खा. वदंना चव्हाण,बाल कामगार आयोग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,सचिव बाल संरक्षण व अधिकार आयोग,मानवाधिकार आयोग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आल्या आहेत
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…
करमाळा, प्रतिनिधी - राज्यभर व्याप्ती असलेल्या युवा भिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने दिला जाणारा…