करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये करमाळा एस.टी डेपोच्या काही बसेस थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी गणेश चिवटे यांच्याकडे केली, याची त्वरित दखल घेत चिवटे यांनी डेपो मॅनेजर होणराव साहेब यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या सह्यांसह निवेदन दिले व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका अन्यथा होणाऱ्या नुकसानास आपण जबाबदार राहणार का असा सवाल उपस्थित केला,
पुढे बोलताना चिवटे म्हणाले की करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या व इतर कोणत्याही अडचणी आल्यास भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधवा असे सांगितले व आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली ,
यावेळी वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, मांगीचे युवा नेते किरण बागल, नानासाहेब अनारसे, हर्षद गाडे व विद्यार्थी उपस्थित होते,
चौकट – प्रत्येक गावातील प्रवासी यांना आम्ही बसमध्ये घेणे बंधनकारक आहे परंतु काही कारणाने जर एसटी थांबत नसेल तर तशी विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार आमच्याकडे करावी आम्ही याच्यावर उपाययोजना करू
– *डेपो मॅनेजर होणराव साहेब*
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…