करमाळा प्रतिनिधी- यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर योग परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने विभाग स्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय श्री.विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या पाठीमागील सभागृहात संपन्न झाले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी.पाटील,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.संभाजी किर्दाक, तालुका क्रीडा अधिकारी प्रा.राम काळे,श्री.तानाजी मोरे, मा .श्री . नरेंद्र पवार साहेब, श्रीमती पेडसे मॅडम अध्यक्षा सोलापूर जिल्हा योग परिषद हे मान्यवर उपस्थित होते. शालेय विभागीय योगासन स्पर्धा वयोगट 14 ,17 व 19 वर्ष मुले व मुली सहभागी झालेले आहेत. सोलापूर जिल्हा व सोलापूर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा व अहमदनगर महानगरपालिका, पुणे जिल्हा व पुणे महानगरपालिका, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका या सात ठिकाणावरून 294 विद्यार्थी या विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये 147 मुले व 147 मुली यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. या विभागीय स्पर्धेचा कालावधी 08 व 09 ऑक्टोबर असा आहे. पुणे,सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यातून आलेले सर्व खेळाडू, प्रशिक्षक , पंच, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोख्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…