करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकीत ऊस बिले, वाहतूक बिले, कामगारांच्या पगारी दिवाळीपूर्वी अदा न केल्यास २८ ऑक्टोंबर रोजी भीक मागो आंदोलन करणार असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना देण्यात आले आहे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, प्रा. राजेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील ,भीमराव ननवरे, बापू गायकवाड, संजय जगताप सर उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सह. साखर कारखाना, श्री मकाई सह. साखर कारखाना, श्री. भैरवनाथ शुगर लि. विहाळ, श्री. गोविंदपर्व गुळ कारखाना राजूरी, श्री. कमलाई शुगर अशा पाचही कारखान्यांनी ऊस उत्पादकांची बिले अद्याप दिलेली नाहीत.
याबाबत शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये बिले न मिळाल्यामुळे असंतोष पसरला आहे. सध्या सणा-सुदीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे कारखान्यांनी दिवाळीपूर्व जर बिले अदा केली नाही, तर शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांचा अंत न पाहता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक बिले, तोडणी बिले, कामगारांच्या पगारी इत्यादी देणी कारखान्यांनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा तालुक्यातील सर्व पिडीत शेतकरी व विविध पक्ष, संघटना सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालय करमाळा व कारखानदारांच्या घरी जाऊन भीक मागो आंदोलन करणार असल्याचे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी सांगितले आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…