मौजे पांगरे येथील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हरघर नल ही योजना पूर्ण झालेली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा मा. रश्मीदीदी दिगंबररावजी बागल, उपाध्यक्षा, भाजपा प्रदेश महिला आघाडी, संचालिका, महाराष्ट्र राज्य साखर संघ यांच्या शुभहस्ते, मा. विलासरावजी घुमरे सर, सचिव, विद्याविकास मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याचबरोबर मा. दिग्विजय दिगांबररावजी बागल, सदस्य, जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांचे निधी मधुन विविध योजना अंतर्गत, 3054 मधून दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये निधी, दलित वस्ती रस्त्यासाठी तीन लाख रुपयाचा निधी, त्याचबरोबर जन सुविधा मधून ग्रामपंचायत कार्यालय शुशोभिकरण करण्यासाठी चार लाख सत्तर हजार निधी दिलेला आहे. त्या कामाचे भूमिपूजन प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी केले. त्याचबरोबर कल्याण सरडे महाराज, मा. घुमरे सर मा. रश्मीदीदी बागल यांची भाषणे झाली. महिला सक्षमीकरणासाठी व तालुक्याचे विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे बागल यांनी सांगितले. आभार सरपंच प्रा. डॉ. विजया दत्तात्रय सोनवणे यांनी व्यक्त केले. यावेळी जल जीवन योजनेसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाना कुलकर्णी व परिवाराचा, संकेत भैरवनाथ पारेकर यांची लातूर येथे अग्निशामक दलामध्ये निवड झाल्याबद्दल व विशाल दत्तात्रय टेकाळे यांची राज्य उत्पादन शुल्क पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक श्री मोतीरामआबा पिसाळ हे होते. या कार्यक्रमास आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब लोकरे, प्रकाश पाटील, पांडुरंग जाधव, ॲड. दत्तात्रय सोनवणे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीशबापू निळ, सचिन पिसाळ, युवराज रोकडे, गणेश तळेकर, कल्याण सरडे सर, विष्णू माने, माजी संचालक बापूराव कदम, बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ शिंदे, सुभाष पवार, वांगी वि. का. वि. सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. विजय रोकडे, रवीकाका जाधव, ग्रा. सदस्य गणेश वडणे, भैरवनाथ हराळे, मयुरा पिसाळ, माजी सरपंच पुष्पा पाडसे, अरुण पिसाळ, तुळशीदास वडणे, हरिदास टेकाळे, परमेश्वर पाडसे, भैरवनाथ पिसाळ, पोपट सातपुते, सहदेव दोंड, राजेंद्र ठोंबरे, महादेव तोबरे, लक्ष्मण दोंड, युवराज तोबरे, संतोष आरकीले, जोतिराम गाडे, सौदागर दोंड आदी गावातील बहुसंख्य महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…