करमाळा प्रतिनिधी
कोरोना पेशंटमागे नगरपरिषदेला 1.5 लाखाचे अनुदान मिळणार आहे अशा प्रकारच्या अफवा सध्या करमाळा तालुक्यात व करमाळा शहरात काही लोकांकडून व्हाटसअप व इतर समाजमाध्यमाद्वारे पसरवल्या जात आहेत व अशा चर्चेला ऊत आला आहे. मात्र सदर सर्व अफवा या खोटया आहेत व बेजबाबदारपणे पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत असे मत करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांनी व्यक्त केले आहे.
वास्तिवक पाहता मार्च महिन्यापासून करमाळा नगरपरिषद कोरोना विरुध्दचा लढा यशस्वीपणे लढत आहे. दि.12 जुलै पर्यंत शहरात एकही रुग्ण नव्हता. सध्या शहरात 120 रुग्ण आहेत त्यापैकी 40 रुगण उपचार घेऊन घरी गेले आहेत तर 80 रुग्ण उपचार घेत आहेत. सदर सर्व रुग्णांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.
या सर्व कोरोना लढयामागे करमाळा नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी बजावल आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविणे, सर्व्हेक्षण, निर्जुंतूकीकरण,रुग्णांचा सर्व्हे, हाय रिस्क, लो रिस्क संपर्क शोधणे, त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी कॉटेज रुग्णालय स्टाफ सोबत काम करणे, जनजागृती, कंटेटमेंट झोन बॅरेकेटींग करणे या सारखे कामे करमाळा नगरपरिषद करीत आहे. करमाळा नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत रुग्णसंख्या वाढल्याने कोव्हीड केअर सेंटर उभारण्याकामी, नगरपरिषदेच्या अध्यक्ष्, पदाधिकारी यांनी परवानगी दिली असून सदर ठिकाणी सर्व सुविधा जसे पाणी, वीज, शौचालय, बाथरुम इ. सोईसुविधा निर्माण करण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. या सर्व कामांसाठी करमाळा नगरपरिषदेने शासनाचा अनुज्ञेय 14 वा वित्त आयोगाचा निधी इतर विकास कामांकरिता न वापरता करमाळा शहरातील नागरिकांना कोरोना संकटातून मुक्त करण्याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता खर्च करण्याचा निर्णय सर्व सन्माननिय मा.अध्यक्ष व मा. नगरसेवकांनी घेतला असून सदर निधी काटकसरीने व योग्य रितीनेच वापरण्यात येत आहे.
मात्रा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही जण नगरपरिदषदेला रुग्णामागे 1.5 लाख अनुदान मिळणार आहे. त्यामुळे नगरपरिषद खोटया चाचण्या घेत आहे अशाप्रकारचे खोटे व बेजबाबदारपणे अफवा पसरवत आहेत. तरी नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व या बिकट परिस्थितीत कोरोनावर मात करण्याकरिता प्रशासनास सहकार्य करावे स्वत:ची व कुटूंबाचे कोरोनापासून रक्षण करावे असे कळकळीचे आवाहन मा.अध्यक्ष वैभवराजे जगताप, सर्व पदाधिकारी व मा.मुख्याधिकारी यांच्यावतीने करण्यात येत आहे.
यापुढे अशाप्रकारच्या खोटया बातम्या किंवा खोटया अफवा पसरवणाऱ्या विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.
गेल्या पाच महिन्यापासून तब्बल 250 नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक, सफाई कर्मचारी आहोरात्र मेहनत घेत आहेत कर्तव्यबजावत असताना आतापर्यंत 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा देखील झाली आहे. जीवावर उदार होऊन कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी तुमच्यासाठी काम करत आहेत. पाच महिन्यांपासून घरातील मुलाबाळांकडे जाण्यासाठी, भेटण्यासाठी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना शक्य झाले नाही. नागरिकांमध्ये मिसळून काम करत असल्याने कधीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो हा धोका असताना देखील सर्व कर्मचारी, पदाधिकारी एकजुटीने कोरोना संकटाशी झुंज देत आहेत तरी अशा कोरोना योध्दयांचा व करमाळा नगरपरिषदेच्या कार्याचा अपमान अफवा पसरवणाऱ्यांनी करु नये असे आवाहन मा,.अध्यक्ष,मा.पदाधिकारी, मा.मुख्याधिकारी व सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी केले आहेत व अफवा पसरवणाऱ्यांवर यापुढे मा.जिल्हाधिकारी साहेब,सोलापूर व मा.तहसीलदार साहेब,करमाळा यांनी देखील योग्य ती कारवाई करावी अशी विनंती ही केली आहे.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…