Categories: Uncategorized

शिवसेना गरबा महोत्सवात महिलांनी लुटला टिपऱ्याचा आनंद लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मानले महिलांनी आभार

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शिवसेनेच्या वतीने आनंद दिघे फेस्टिवल अंतर्गत गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या गरबा उत्सवात हजारो महिलांनी दांडियाची फेरी धरत आपल्या कलागुणांना आविष्कार देत नृत्य स्पर्धेचा अविष्कार दाखवला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे,महिला जिल्हा समन्वयक पद्मजा इंगवले करमाळा महिला शहर प्रमुख कीर्ती स्वामी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत यांच्या पुढाकाराने श्री कमला भवानी नवरात्र उत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करमाळा शहरात करण्यात आले आहे.तीन दिवस चाललेल्या उत्सवासाठी पुणे येथून साऊंड सिस्टिम व गायक कलाकार मागवण्यात आले आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँकर संदीप पाटील पुणे.रील स्टार निलेश भुसारेअभिनेत्री दीक्षा शिंदे यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन एस के इव्हेंटअँड मॅनेजमेंट करमाळा यांनी केलेमुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या गाण्यावर दांडिया रास चांगलाच गाजलाया कार्यक्रमात कोणत्याही पुरुषाला एन्ट्री नसल्यामुळे महिलांना मुक्त वातावरणात या गर्बाउत्सवाचा आनंद घेता आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वतःच्या पतीसाठी आपली किडनी देऊन नवऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या स्मिता मसलेकर यांच्या हस्ते करण्यात आले

****

पुढील वर्षी नामांकित अभिनेत्रींना आमंत्रित करून करमाळा शिरूर तालुक्यातील महिलांना गरबा उत्सवाचा आनंद देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने यापेक्षाही मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील असा विश्वास यावेळी आपल्या मनोगत आतून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

11 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

1 day ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 day ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago