नवरात्रीनिमित्त केत्तुर येथे पोलिस निरिक्षक श्री विनोद घुगेसाहेब यांनी केले समाज प्रबोधन व्यसनांपासुन युवकांना दुर राहण्याचे केले आवाहन


करमाळा प्रतिनिधी- मौजे केत्तुर ता करमाळा येथे शुक्रवार दिनांक -११/१०/२४ रोजी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहुन करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री विनोदकुमार घुगे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . आपण समाजात वावरताना व्यसनापासून दुर राहीले पाहिजे व व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे तसेच आजची तरुण पिढी व्यसनाधिन होत असुन यातुन परावृत्त होणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत .आपली शरीर संपदा आरोग्य हे चांगले सुदृढ ठेऊन आपले गावाची ,राज्याची देशाची सेवा केली पाहिजे. कायदयाचा बडगा दाखवुन वाईट गोष्टी नष्ट करणे हे सोप्पे असते परंतु वाईट गोष्ट होऊच नये याकरीता मनातुन ठरले पाहिजे. उपस्थित महिला तसेच मंडळाचे कार्यकर्ते युवक मंडळींना यावेळी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . यावेळी मंडळातर्फे सरपंच सचिन वेळेकर यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

11 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

1 day ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 day ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago