Categories: करमाळा

सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‌ कमलाई देवी गौरव पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचामाळ ता.करमाळा येथे श्री कमलादेवी माता नवरात्र उत्सवा निमित्त करमाळा फेस्टिवल चे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमामध्ये ‌‌ उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार देऊन सलमान करण्यात येतो. यंदाच्या वर्षी 2024 चा श्री जगदंबा देवी बहू उद्देशीय संस्था व महप्रसाद वाटप मंडळ, अन्न छत्र मंडळ यांच्या वतीने *राज्यस्तरीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार*तपश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे यांनी श्री  श्रेणिक शेठ खाटेर यांच्या आज पर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे अन्न छत्र मंडळाचे सदस्य यांचे सह एस. वी. मॉल चे जयराज कदम, योगेश सोरटे , मा. सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र फलफले, अक्षय सोरटे , दीपक थोरबोले, बाळासाहेब नरारे सर,लष्कर सर,दत्ता रेगुडे , संतोष वारे , आशिष बोरा , चंद्रकांत कालदाते, विजय बरिदे यांचे सह रांगोळी स्पर्धेचे विजेते , डान्स स्पर्धेचे विजेते , यांचे सह त्यांचे सर्व पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन करतांना शेखर जोगळेकर यांनी  श्रेणिकशेठ खाटेर यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या कार्याचे विशेष ‌कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago