Categories: करमाळा

भारतीय जनता पार्टी ग्रामीण तालुका अध्यक्षपदी मकाईचे संचालक सचिन बापू पिसाळ यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका ग्रामीण अध्यक्षपदी पांगरे गावचे माजी उपसरपंच मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सचिन बापू पिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड   सोलापूर येथे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या हस्ते पत्र देऊन शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करून करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या सहकाऱ्यांने युवकाचे संघटन करून करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम वाढवणार असल्याचे सचिन पिसाळ यांनी सांगितले. सचिन पिसाळ पांगरे गावचे माजी उपसरपंच असून मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक म्हणून काम करत आहेत सचिन पिसाळ यांनी ग्रामीण भागामध्ये चांगले काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजप महायुती सरकारने ‌ लाडकी बहीण योजना, ‌शेतकरी वीज माफी योजना, वयोश्री योजना, बांधकाम कामगार कल्याण योजना, शेतकरी पेन्शन योजना यासारख्या आणि कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‌ लोक कल्याणकारी योजना करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचून सर्वसामान्य ‌ नागरिकांना न्याय मिळवून देणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये गावागावात ‌ भाजपच्या शाखा ‌ काढून करमाळा तालुका भाजपामय करणार असल्याची सचिन पिसाळ यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यातील विविध स्तरातून होत आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्याचे युवा नेते मा. दिग्विजय बागल यांनी सत्कार करून अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन मा. दिनेश भांडवलकर, मार्केट कमिटीचे माजी सभापती मा चिंतामणी दादा जगताप, ॲड. दत्तात्रय सोनवणे, बरडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago