Categories: करमाळा

दसरा मेळाव्याला नारायण गड येथे जाण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांच्याकडून 500 वाहनांना मोफत इंधनाची सोय

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगेसोयरेची अंमलबजावणी होऊन समाजाला न्याय मिळावा याकरिता मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‌ नारायणगड जि बीड येथे सकल मराठा समाजाचा दसरा ‌मेळावा ‌ संपन्न झाला .या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास ‌झोळ सर यांनी ‌ करमाळा तालुक्यासाठी ‌समाजबांधवाना  नारायण गड येथे उपस्थित राहण्यासाठी पाचशे गाड्यांना मोफत इंधन देण्याचे काम त्यांनी केले आहे..मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगळे सोयरेची अंमलबजावणी करुन सरकारने न्याय द्यावा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजबांधवाबरोबर अनेक बहुजन बांधव जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक होते .त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईत खारीचा वाटा उचलावा या भावनेतून म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे . संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देऊन मुंबईला जाण्यासाठी तीनशे वाहनांच्या मोफत इंधन देण्याचे काम केले होते त्याचबरोबर सोलापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने‌ शांतता रॅली काढण्यात आली.याकरीता करमाळा तालुक्यातील समाज बांधवांना जाण्यासाठी अडीचशे चार चाकी व शंभर दुचाकी गाड्यांना मोफत इंधन देण्याचे काम प्राध्यापक रामदास झोळसर ‌यांनी केले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत सहभागी होऊन दातृत्वाने मोफत इंधन देण्याचे काम करणाऱ्या प्रा.रामदास झोळ सर यांचे मराठा समाजाकडून कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरताल महोत्सवाचे आयोजन*

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५…

1 day ago

करमाळा भाजपाकडून विविध उपक्रमांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी- भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी…

1 day ago

गुरु गणेश गोपालन संस्था यांच्यावतीने गुरू गणेश मिश्री ध्यान केंद्राचे उद्घघाटन गुरु महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा…

2 days ago

भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…

3 days ago

करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…

3 days ago