करमाळा(प्रतिनिधी)- करमाळा शहरासाठी उजनी जलाशयातून पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव पंपहाऊस
येथे २४० अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप खरेदीसाठी नगरपरिषद प्रशासनाने निधीची मागणी केल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांनी अवघ्या महिनाभरातच
शासनाकडून १कोटी ४०लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून यामुळे आता करमाळेकरांसमोरील
कृत्रिम पाणीटंचाईचे संकट लवकरच संपुष्टात येणार आहे.
१९९३ साली दहिगाव येथून कार्यान्वित झालेल्या या योजनेसाठी २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीचा एक असे तीन पंप बसवण्यात आलेले असून हे पंप जुने झाल्याने बिघाड,दुरुस्ती या कारणामुळे शहराचा पाणीपुरवठा उजनीत तुडुंब असतानादेखील
वारंवार विस्कळीत होत असल्याने निर्माण होणाऱ्या
कृत्रिम पाणीटंचाईमुळे शहरवाशीय हैराण झालेले होते.
आता आमदार शिंदे यांच्या माध्यमातून पंप खरेदी
करण्यासाठी तातडीने निधी मंजूर झाल्याने नवीन पंप बसविल्यानंतर शहरासमोरील पाणीसंकट कायमस्वरूपी दूर होणार असल्याने शहरवाशीय आणि विशेषतः महिला
वर्गाकडून आमदार संजयमामा शिंदे यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या कृत्रिम पाणीटंचाईमुळे
शहरवाशीय संत्रस्त झालेले होते.मात्र याविषयी या
आधीचे लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन
हे पूर्णतः बेफिकीर व निष्क्रिय होते.परंतु आता
प्रशासनाच्या मागणीनंतर आमदार संजयमामांनी
तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही कृत्रिम
पाणीटंचाई संपणार आहे.या कार्यतत्परतेबद्दल
महिलावर्गाकडून मामांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
– प्रियांका गायकवाड,अध्यक्षा-शिवसेना तालुका महिल्स आघाडी
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…