Categories: करमाळा

युवा नेते शंभुराजे जगताप यांनी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भैट घेऊन उमेदवारी मिळाल्यास विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज

करमाळा प्रतिनिधी जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप यांनी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भैट घेऊन त्यांच्याकडून उमेदवारी मिळाल्यास विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विश्वास जुना जगताप गट पुन्हा या भावनिक आवाहनामुळे जगताप गटाकडून सर्वात लहान वयाचे तरुण उमेदवार शंभुराजे जगताप यांनी निवडणूक लढवण्याची कार्यकर्ते जनतेची इच्छा आहे. जगताप गटाची पारंपारिक मते  मराठा मुस्लिम बहुजन बांधवांचाचे जोरदार समर्थन जगताप गटाच्या अस्तित्वासाठी करमाळा तालुक्यातील जनतेचे मिळणारे पाठबळ कै . नामदेवराव जगताप यांचे नातु म्हणून जनतेकडून मिळणारा प्रतिसाद जगताप गटाकडुन मिळालेले समर्थन यांच्या जोरावर युवानेते शंभूराजे जगताप विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जूना गट म्हणून जगताप गटाची ओळख आहे.
देशभक्त स्वर्गीय नामदेवराव जगताप व स्वर्गीय पांडुरंग आण्णा जगताप यांच्या माध्यमातून जगताप गट स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत करमाळा तालुक्यातील राजकारण व समाजकारणात केंद्रस्थानी राहीला आहे. हा गट फक्त तालुक्यापूरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकारणात सुद्धा आपला दबदबा निर्माण करण्यात मागे राहीला नाही.
आमदारकीच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य परिवहन मंडळ सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, राज्य सहकारी बाजार संघ संचालक आदी पदांना जगताप गटाने गवसणी घातली आहे.
जगताप गट हा १९३६ पासून अठरापगड जातींचा, सर्वधर्म समभाव मानणारा युवकवर्ग ते बुजूर्ग जेष्ठांचा सदैव जनतेची सेवा करणारा गट आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व राजकिय पदांवरती जगताप गटाचे प्रतिनिधी नेतृत्व करत आहेत. स्वर्गीय नामदेवराव जगताप यांनी तालुक्याचे स्वतः पाच टर्म व आरक्षण काळात कार्यकर्ते दोन टर्म असे नेतृत्व केले
आहे. त्याच्या निधनानतर जयवतराव जगताप याना १९९० साली अपक्ष एक टर्म व शिवसेना पक्षातून एक टर्म असे दहा वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहे.
त्यांचे धाकटे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी शैक्षणिक वाटचाल चालू असताना २०१८ साली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी पासून राजकिय वाटचालीला सुरुवात केली. सत्ता स्थापनेवेळी राजकीय कुरघोड्यांमुळे ५६ दिवस कारावास भोगला असून त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २०१९ विधानसभा व लोकसभा निवडणुकीत तसेच दरम्यान च्या काळातील तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या व सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीत, २०२३ साली झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीत विशेष महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
यातूनच त्यांची खरेदी विक्री संघाचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवड झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्या कार्याची दखल घेवून भाजपा या राष्ट्रीय पक्षाने जिल्हा यूवा मोर्चाचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक समाजपयोगी विधायक उपक्रम राबविले. तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघ पिंजून काढला व युवकांचा दांडगा जनसंपर्क वाढवला.पक्षाचे इमाने इतबारे काम करत असताना संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मुद्दयावर मराठा समाजाला जाहीर व निर्भीडपणे पाठींबा दिला
मोर्चाचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक समाजपयोगी विधायक उपक्रम राबविले. तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघ पिंजून काढला व युवकांचा दांडगा जनसंपर्क वाढवला.पक्षाचे इमाने इतबारे काम करत असताना संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मुद्दयावर मराठा समाजाला जाहीर व निर्भीडपणे पाठींबा दिला त्यामुळे पक्षाने बडतर्फीची कारवाई केली.
तरीही खचून न जाता त्यांनी पूर्ण क्षमतेने समाजकार्य चालु ठेवून आपल्या कार्याची छबी उंचावली आहे. वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. तालुक्यात युवकांची उस्फुर्त फळी त्यांच्या पाठीशी आहे. निष्ठावंत जगताप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोबत आहेत. फक्त मराठा समाजच नाही तर सर्वच समाजाच्या वतीने मतरूपी आशिर्वाद मिळू शकतो असे स्पष्ट चित्र आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

15 hours ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago