Categories: करमाळा

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली , आता पुढील भूमिकेकडे लक्ष

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा विधानसभेसाठी उमेदवारी देऊ केली होती . परंतु जगताप यांनी ती उमेदवारी टाळल्याचे अथवा नाकारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .करमाळ्याचे अजित दादा समर्थक अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांनी पक्षाचे उमेदवारी घेणार नसल्याचे सांगितल्यानंतर पवार यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मुंबई येथे भेटीसाठी बोलावले होते .यावेळी पवार यांनी जगताप यांना करमाळा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढविणे विषयी विचारणा केली होती .तसेच लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या माध्यमातून करमाळा येथे तुमच्या उमेदवारीचे सूतोवाच व राजकीय समर्थन जाहीर करतो व तुमच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अंबालिका कारखान्याची यंत्रणा तुमच्या पाठीशी उभा करतो तुम्ही उमेदवारी स्वीकारा बाकी सर्व मी पाहतोअसे अजित दादा पवार यांनी जगताप यांना भेटीवेळी सांगितले होते .परंतु जगताप यांनी सध्याच्या केंद्र व राज्य शासनाबद्दल जनतेच्या मनात तीव्र रोष व नाराजी असून जनतेच्या विचारांशी मी प्रतारणा करू शकत नाही असे स्पष्टपणाने सांगितले . तसेच लाडकी बहीण योजनेचे अनुदान ,अंबालिकाचा दर या बाबी जनतेच्याच खिशातून जीएसटी सारख्या व अन्य कराच्या माध्यमातून स्वतःच्याच पैशातून स्वतःला मिळत असल्याची जनतेची भावना आहे असे जगताप यांनी अजित दादा पवार यांना सांगितले .आपण ताकद दिलेले आपले समर्थक अपक्ष आमदार देखील आपली उमेदवारी नाकारत आहेत यावरून आपण राजकीय रसद पुरवून देखील तेआपल्याशी एकनिष्ठेने राहिले का ? याचा गांभीर्याने विचार करावाअसे जगताप यांनी पवार यांना सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने महायुतीची उमेदवारी टाळली अथवा नाकारली आहे .त्यानंतर अजित दादा पवार यांनी करमाळा दौरा केला होता यावेळी होणाऱ्या विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर व कोनशिले वर माजी आमदार जगताप यांचा नामोल्लेख असताना देखील जगताप यांनी या दौऱ्यात जाण्याचे टाळले होते . त्यानंतर जगताप यांनी सोलापूर येथे माजी केंद्रीयमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची देखील भेट घेतली होती .गेल्या वर्षी करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोहिते पाटील यांच्या पुढाकारामुळे बिनविरोध झाली होती .तेव्हापासून जगताप यांची मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांचेशी जवळीक वाढल्याचे दिसत आहे .लोकसभा निवडणुकीत जगताप गटाने बाजार समिती निवडणूकीत केलेल्या सहकार्याची परतफेड म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता .गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता ,आमदार शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जगताप यांची अनुपस्थितीआदी बाबींचा विचार करता जगताप हे शिंदेंपासून दुरावलेत का ?अशी ही चर्चा आहे. २०१९ साली झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार जगताप यांच्या पाठिंब्यामुळेच आमदार संजय मामा शिंदे हे विजयी होऊ शकले हे निर्विवाद सत्य आहे .आता जगताप यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून जगताप गटाच्या भूमिकेवरच विधानसभा निवडणुकीच्या निर्णयाचे भवितव्य अवलंबून आहे .जगताप स्वतः निवडणूक लढणार का ?आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा देणार की नारायण पाटील यांना समर्थनाची भूमिका घेणार ? या सर्व बाबी सध्यातरी अनुत्तरीत आहेत .करमाळा विधानसभेच्या निवडणुकीत जगताप गटाच्या भूमिकेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण आत्तापर्यंत झालेल्या १६ निवडणुका पैकी जगताप कुटुंबातील सात वेळा , जगताप यांनी पाठिंबा दिलेले चार वेळा असे अकरा वेळा जगताप समर्थक आमदार करमाळा विधानसभेत विजयी झालेले आहेत .त्यामुळे जयवंतराव जगताप यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.याविषयी जगताप यांना विचारले असता या वृत्ताला त्यांनी दुजोरा देत तालुक्याच्या विकासासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचे देखील माजी आमदार जगताप यांनी सांगितले .

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

5 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

12 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

21 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago