करमाळा प्रतिनिधी – प्रत्येक निवडणुक ही विकासाच्या मुद्दयावरच होत असते यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना संजय मामा शिंदे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते ॲड .अजित विघ्ने यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेला आमदार संजयमामा शिंदे यांनी खऱ्या अर्थाने गती दिली आहे सुप्रमा मंजुर करून कोट्यावधींचा निधी आणुन कामही केले आहे व पाच वर्षे या भागातील शेतकऱ्यांना त्याचा पुरेपुर लाभ मिळवून दिला आहे . पाण्यासाठी होणारी आडवाआडवी आणि पळवापळवी थांबवली आहे .या योजनेचे विजेचे बिल , पाणी पट्टी याबाबत विशेष प्रयत्न देखिल केले , कॅनालचे अस्तरीकरण , बंधिस्त पाईपलाईन , पपिंग स्टेशन येथील अडथळे दुर केले यासह आवश्यक कामे करून योजना प्रभाविपणे चालवली आहे. याशिवाय तालुक्यातुन राशीन बॉर्डर ते वेणेगाव पर्यंतचा ७१ किमी चा रस्ता मंजुर करून आणला आहे . डिकसळच्या ब्रिटीश कालीन पुलाचे ठिकाणी नवीन पुलासाठी मंजुरी घेत ५५ कोटींचे काम चालु केले आहे .टेंभुर्णी जातेगाव रस्त्या साठीची महत्वाची राज्य शासनाची एनओसी मिळवून मंजुरी घेतली आहे. पर्यटन च्या माध्यमातुन २८२ कोटींचा विशेष निधी मंजुर झाला आहे. आवाटी , रायगाव , राजुरी सह अनेक ठिकाणी वीज उपकेंद्रे चालु केली असुन कात्रज , जिंती , कोळगाव सह अनेक ठिकाणी ॲडिशनल ट्रान्सफार्मर बसवुन विजेची समस्या दूर केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने करमाळा येथील कॉटेज रुग्णालय बांधकामासह सुसज्ज केलेले असुन आयसीयु बेडसह अत्याधुनिक सुविधा वाढविल्या आहेत. कुर्डुवाडी सह करमाळ्यात ट्रामा केअर सेंटर तयार आहे . मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती सुसज्ज आहेत लवकरच अधिकारी कामगार भरतीही होईल. तहसिल कार्यालयासह तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचे २८ ठिकाणच्या इमारतीं करीता विशेष निधी मंजुर असुन निवडणुकीनंतर कामे मार्गी लागणार आहेत. कमलादेवी मंदीर , आवाटी दर्गाह , आदिनाथ मंदीर संगोबा , कोटलिंग मंदीर चिखलठाण यासह तालुक्यातील अनेक ठिकाणी विशेष निधी दिला आहे . याशिवाय तालुक्यातील अनेक छोटे मोठे रस्त्यांची कामे झाली असुन काही चालु आहेत तर अनेक मंजुर कामे निवडणुकीनंतर प्रगतीपथावर येतील . याशिवाय उजनी कुकडी प्रोजेक्ट सादर करून लवकरच उजनीवरून दोन उपसा सिंचन प्रकल्प मंजुर होवुन कोर्टी रायगाव वीट भागातील कोरडवाहु क्षेत्र ओलिताखाली येणार आहे . पोंधवडी चारीचे काम प्रभावीपणे केलेले असुन कोर्टी भागातील लहान तलावांची कामे देखिल होत आहेत. करमाळा , कुर्डुवाडी नगरपरिषदा सहीत मतदारसंघात जलजीवन योजनेच्या माध्यमातुन कोट्यावधीचा निधी प्राप्त झालेला असुन भविष्यकाळात या योजना प्रभाविपणे राबणार आहेत. वस्तुतः कोव्हीड -१९ चा दुर्देवी दोन अडीच वर्षाचा कालावधी जाऊनही उर्वरीत एक दोन वर्षात आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेले नियोजन प्रभावी आहे ,त्यामुळे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे काळापासुन त्यांनी करमाळा मतदार संघातला प्रत्येक माणुस जोडला आहे. विरोधकांवर देखिल कसलीही टिका टिप्पणी करण्यात वेळ न घालवता कायमच तालुक्याचे आणि जनतेच्या विकासासाठी कार्य केले आहे . जनता दरबार , गाव भेट दौरे , आमदार आपल्या दारी यासह अनेक उपक्रम प्रभाविपणे राबवुन प्रत्येकाचे सुख दुःखाचे कार्यक्रमात उपस्थित राहात आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे . त्यामुळे निष्क्रीयतेच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांनी आपली स्वतःची निष्क्रीयता आणि हतबलता तपासणे महत्वाचे आहे .निवडणुका लागल्या की जनतेचा दांभिक पुळका आणुन बेताल वक्तव्ये करायची ही नौटंकी जनतेने ओळखली आहे. करमाळ्यातील सहकाराची मंदीरे उद्वस्थ झाली आहेत आणि ती मंदीरे उद्वस्थ करण्याचे कट कारस्थान आणि पाप कोणी कोणी केले आहे हे जनतेला माहीत आहे. बारामती ॲग्रो च्या माध्यमातुन आदिनाथ आज चांगला चालून प्रगतीपथावर राहीला असता परंतु त्यावेळी चुकीच्या भुमिका घेत कोणी कोणी विरोध केला काय काय वक्तव्ये केली , सुभाष आबा गुळवे यांना तर कारखान्यावरून हाकलुन देण्यात आले. त्यामुळे हे जनता जनार्दनाना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.२०२४ च्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा तालुक्यातुनच निर्णायक आघाडी घेतील याचा पुनर्वउच्चार करीत टिकेला प्रतिउत्तर दिले आहे तसेच ९५० किमी चे रस्ते कुठे कुठे केले कारण जर हे रस्ते केले होते तर ते कुठे गायब झाले आहेत ते तरी सांगा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर मंडल…
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष पंडितराव देशमुख यांची…
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…