Categories: करमाळा

शेलगावचे सौंदे येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्यासह संजयमामा शिंदे गट बागल गटास सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश

करमाळा प्रतिनिधी 
शेलगाव(क)येथील विद्यमान सरपंच आत्माराम वीर,मा.ग्रा.पं.सदस्य हनुमंत वीर,भुजंग वीर,बाबुराव माने,अरुण भाऊ काटोळे,मारुती वाघमारे यांनी तर सौंदे गावातून विद्यमान सरपंच जोतिराम लावंड व असंख्य कार्यकर्ते तसेच हिसरे गावातून मां. ग्रा. पं. सदस्य प्रकाश खरात, संजय राऊत, लक्ष्मआणि मिरगव्हाण गावातून उपसरपंच रामभाऊ ओहोळ, मां.ग्रा. पं. सदस्य भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य सचिन लावंड, माजी ग्रामपंचायत सदस्य सोपान हाके, कालिदास दिसले सोपान हाके राजेंद्र सुरवसे नाथराव सुरवसे,नागनाथ सुरवसे,बालाजी सुरवसे भिमराव सुरवसे शिवाजी पवार लक्ष्मण पवार, रामदास शिंदे लक्ष्मण शिंदे बाळू शिंदे सोमनाथ शिंदे सचिन शिरसाट संभाजी शिरसाट,वसंत ओहोळ बापूराव मोहोळ अमोल सुरवसे आबा सुरवसे यांनी माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. काल महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांची शेलगाव ( क ) ता करमाळा येथे प्रचार सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते श्रीधर पाटील होते तर यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, माजी संचालक धुळा भाऊ कोकरे, माजी सरपंच पोपट पाटील ( नेर्ले ), उपसभापती दत्ता सरडे, माजी सरपंच भास्कर भांगे ( कंदर ), आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ, बाजार समिती संचालक बाळासाहेब, नेटके साहेब, चंद्रकांत अंबारे, सरपंच राजू भोसले (राजुरी ), सरपंच अंकुश शिंदे (पोथरे), आबासाहेब अंबारे, नाना गोडगे, सरपंच शहाजी राऊत ( कोंढेज), अविनाश सरडे, उपसरपंच टिंकू सरडे (चिखलठाण), उपसरपंच तानाजी नीळ (गौडरे), सरपंच गणेश घोरपडे (वरकटने) आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.
” शेलगाव (क) हे गावाचा वीज कपातीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. तसेच उजनी – मराठवाडा बोगद्यातून शेलगाव (क ) व इतर गावांना शेतीसाठी कायमस्वरूपी उचलपाणी परवाने मिळवून देणार आहे. येथील श्री नागनाथ मंदिराचा सभा मंडपासह सुविधा निर्माण करून तीर्थक्षेत्र विकास करणार” – नारायण (आबा) पाटील (महाविकास आघाडी उमेदवार)

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

11 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

1 day ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

1 day ago