Categories: करमाळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीकडून युवा नेते दिग्विजय बागल यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभेची महायुती मधील जागा शिवसेनेला जाहिर झाली असून बागल गटाचे युवा नेते मकाईचे ‌ चेअरमन दिग्विजय बागल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांना एबी फार्म देण्यात येणार आहे.दिग्विजय बागल यांनी सोमवारी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला होता.परंतु करमाळ्याची जागा शिवसेनेची असल्या कारणाने या जागेवर प्रबळ असणारा गटाचे उमेदवाराची निवड होणे अपेक्षित होते. त्यामुळे बागल गट हा करमाळा तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रबळ असणारा गट असल्याने दिग्विजय बागल यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. मार्गदर्शक विलासराव घुमरे सर भगिनी सौ रश्मी दीदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ‌‌महायुती मधूनही दिग्विजय बागल यांना मोठें पाठबळ मिळाले आहे. युवा नेते दिग्विजय बागल धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. वर्षा बंगल्यावर ‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिग्विजय बागल ‌ यांनी सहकार्यासह शिवसेनेत प्रवेश केला ‌ .यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे संपर्कप्रमुख रवींद्र आमले मार्गदर्शक विलासराव घुमरे सर मकाईचे संचालक आशिष गायकवाड आदिनाथ कारखान्याचे चेअरमन  श्री. धनंजय डोंगरे मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ,श्री सतीश बापूं निळ, श्री. राजेंद्र मोहल्कर कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा माजी संचालक श्री. देवानंद ढेरे, मकाई  साखर कारखान्याचे मा. संचालक श्री. नंदकुमार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते  उपस्थित होते.दिग्विजय बागल यांना उमेदवारी  मिळाल्यामुळे बागल गटामध्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे आनंदाचे वातावरण पसरले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago