Categories: करमाळा

करमाळा तालुक्याच्या सर्वागिंण विकासासाठी भरघोस निधी आणला असुन विकास कामांवर निवडणूक रिंगणात-आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्वागिंण विकासासाठी भरघोस निधी आणला असुन विकास कामांवर निवडणूक रिंगणात उतरलो आहे असे मत आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघ उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना व्यक्त केले आहे.करमाळयाचा या पुढेही विकास करायचा आहे. मी कधीही खोटी आश्वासने देत नाही आणि पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे विकास कामाबाबत बोलण्याची माझी कधीही तयारी आहे’, असे म्हणत त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारले आहे.आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक २८ ॲाक्टोंबर रोजी साधेपणाने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, विलास पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, वीटचे उदय ढेरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले, मानसिंग खंडागळे, युवराज गपाट, चंद्रहस निमगिरे, सरपंच रवींद्र वळेकर, अशपाक जमादार, कन्हैयालाल देवी,माजी नगरसेवक प्रवीण जाधव, सावडीचे श्री. शेळके, केशव दास आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी यावेळी कडक बंदोबस्त ठेवला होता.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago