करमाळा प्रतिनिधी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्यावतीने दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दाम देऊन त्यांना त्यांचा व्यवसाय समृद्ध करण्याचे काम करीत असून त्यांचे जीवन आत्मनिर्भर करणार असल्याचे मत डॉक्टर विशाल केवारे यांनी व्यक्त केले. दिवाळीनिमित्त कमलाई दूध मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट च्या वतीने दूध डेअरी चेअरमन सभासद कर्मचारी यांचा स्नेह मेळावा करमाळा येथील विराज हॉटेल येथे 29 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुढे बोलताना डॉक्टर विशाल केवारे म्हणाले की दिवाळी सण मोठा आनंदला नाही तोटा एका कुटुंबाप्रमाणे कमलाई मिल्क करमाळा परंडा वरकुटे रोपळे येथे काम करीत असून एका कुटुंबाप्रमाणे शेतकऱ्याची काळजी घेत त्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याने आमचे एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. कुठल्या व्यवसायामध्ये जिद्द चिकाटी परिश्रम प्रामाणिकता असेल तर या क्षेत्रामध्ये आपण यश प्राप्त करून आपले जीवन समृद्ध करू शकतो शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या उन्नती करता विविध योजना राबवून त्याचे जीवन सुखकर कसे करता येईल असा आमचा प्रयत्न असल्याने कमलाई मिल्क प्रॉडक्ट चा एक परिवार तयार झाला आहे. करमाळा येथे आयोजित केलेल्या या मेळावा मध्ये अडीचशे ते तीनशे दूध डेअरी चेअरमन सभासद कर्मचारी उपस्थित होते. दूध व्यवसायात काम करताना आपला कोणीही सत्कार करून दिवाळीनिमित्त भेटवस्तू स्नेहभोजन देऊन सन्मान केला नाही असे मत दूध डेअरीचे चेअरमन सभासद कर्मचारी यांनी व्यक्त केले मनाचा मोठेपणा दाखवून खऱ्या अर्थाने आमच्या कामाचे कौतुक करून आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल डॉक्टर विशाल केवारे यांचा सर्व दूध डेअरी चालकांच्या वतीने मानाचा जरीचा फेटा शाल श्रीफळ देऊन वांगी नंबर चर्चे चेअरमन नागनाथ तकिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विचार के वारे म्हणाले की शेतकऱ्याला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग असून कमलाई दूध मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर कदम यांनी मानले.