करमाळा प्रतिनिधी
2024 विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्यासाठी उमेदवारांचे गाव भेट दौरे सुरू आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांनी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आणि 29 तारखेपासून करमाळा तालुक्यात गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली.मंगळवारी त्यांनी देवीचा माळ येथे दुपारी 2 वाजता प्रचाराचा नारळ फोडला. दिवसभरात त्यांनी देवीचा माळ , हिवरवाडी ,भोसे, वंजारवाडी, लिंबेवाडी व रायगाव या गावांना भेटी दिल्या. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे उत्साहात स्वागत केले.
दिनांक 30 ऑक्टोबर बुधवार रोजी पांडे, मांगी, वडगाव उत्तर, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, बिटरगाव (श्री), कामोणे येथे कॉर्नर बैठका झाल्या. त्यानंतर सायंकाळी पोथरे येथे सभा झाली.या दौऱ्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी वाजतगाजत स्वागत होत आहे. पोथरे येथील सभेत बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की,
आपण फक्त विकास कामांवरच निवडणूक रिंगणात उतरलो आहे.यापुढेही विकास कामे करायची आहेत.या सर्व गावांची मुख्य समस्या पाणी. सुदैवाने या पंचवार्षिक मध्ये कुकडी प्रकल्पाचे पाणी बंद पाईपद्वारे मांगी तलावात सोडण्यात यावे यासंदर्भात पाठपुरावा केला.त्याच्या सर्वेचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असतानाच प्राप्त झाले होते. कुकडी प्रकल्पावरती अवलंबून असलेला मांगी तलाव पूर्ण क्षमतेने भरला पाहिजे आणि लाभक्षेत्रातील गावांना त्याचा फायदा झाला पाहिजे यादृष्टीने प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी मांगी तलावत सोडणे आणि त्या माध्यमातून या भागाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.काम करत असताना मी माझा व विरोधातला असा कधीही भेदभाव केला नाही.आलेल्या प्रत्येकाचे काम करण्यावर माझा भर आहे’, असे यावेळी आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…