Categories: करमाळा

मलवडी येथे नारायण पाटील गटाला धक्का… पै.बंडुनाना कोंडलकर, उपसरपंच साहेबराव दुरगुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश


करमाळा प्रतिनिधी
2017 सालापासून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विकासकामे करताना मी कधीही राजकारण केले नाही किंवा कोणाची अडवणूकही केलेली नाही. आरोग्य, रस्ता, वीज व शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत कटिबद्ध राहीन , प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहवे, बंडुनाना तुमच्या पाठीशी खंबीरपणे भावासारखा उभा राहुन तुम्हाला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले .
मलवडी तालुका करमाळा येथील माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाला जबर धक्का बसला असुन मलवडी येथील पैलवान बंडुनाना कोंडलकर , उपसरपंच साहेबराव दुरगुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे .यावेळी विजय पालवे , गुरुनाथ पालवे, राघू कोंडलकर , रमेश कोंडलकर , आबा कोंडलकर , रेवणनाथ कोंडलकर , सर्जेराव कोंडलकर , रवींद्र पालवे , सर्जेराव बागल , पप्पू कोळी , कल्याण सातव तसेच पाथुर्डी येथील सदाशिव तोडेकर , हनुमान तोडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे गटात प्रवेश केला .
यावेळी माजी सभापती गोकुळ पाटील , ज्ञानेश्वर शेलार , माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी , चंद्रहास निमगिरे , माजी पंचायत समितीचे सदस्य विलास पाटील , सरपंच तानाजी झोळ , पैलवान उमेश इंगळे , राजेंद्रकुमार बारकुंड , म्हैसगाव चे लक्ष्मण पाटील , खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन प्रविण पाटील , कन्हेरगांव चे धनंजय मोरे , मारुती पारखे , अच्युत तळेकर , सरपंच किरण फुंदे , सरपंच रवींद्र वळेकर , घोटी चे सरपंच विलास राऊत , गुलाबराव देवकते , भाऊसाहेब खरात , अभिजित तळेकर , पैलवान चेतन पाटील , सनी टकले , महावीर कोंडलकर , शहाजी कोंडलकर , सिध्दूभाऊ मोटे , मयुर रोकडे , अशोक तकिक , गौतम ढाणे , रोहिदास सलगर , स्वप्निल पाडुळे , धनाजी ननवरे , शरद काळे , रामभाऊ लवळे , सतीश पन्हाळकर , धनाजी शिंदे , गोरख तळेकर , नंदकुमार जगताप उपस्थित होते .
प्रारंभी मलवडी गावातून आमदार संजयमामा शिंदे यांची घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढत वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सभास्थळी आगमन झाले . सभेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .

चौकट –
2024 च्या निवडणुकीचा निकाल सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही – पै.बंडुनाना कोंडलकर मालवडी.
2019 च्या निवडणुकीत आम्ही पन्हाळकर, सुरवसे ,दुर्गुळे आणि गावातील इतर समाजांना सोबत घेऊन 1000 मताचा लीड नारायण आबांना दिला होता. त्यावेळेस अवघी 100 मतं संजयमामांना आमच्या गावातून मिळाली होती .यापूर्वीच आमच्या गावातील अनेकांनी मामांच्या गटात प्रवेश केला होता.आता आम्हीही प्रवेश केलेला आहे. आमच्या गावाशेजारील पाथुर्डी, घोटी, तसेच हजारवाडी, केतुर नं.1, मिरगव्हण, घारगाव, धायखिंडी, निलज येथील असंख्य कार्यकर्ते रोज मामांच्या गटात प्रवेश करत आहेत, त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी आमदार संजयमामा शिंदे यांचा विजय निश्चित आहे.तो निकाल सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago