करमाळा. प्रतिनिधी
राजुरी ता.करमाळा येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाला धक्का बसला असुन भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या गाव भेट दरम्यान राजुरी येथील पिनू साखरे,भाऊ सराटे,संतोष मोहीते,मारुती साखरे,बापूसाहेब साखरे,आजिनाथ शिंदे,नाना साखरे,लक्ष्मण शिंदे,योगेश लांडगे, दादासाहेब जाधव, राहूल पाटील,सोनू साखरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला राम राम करत महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.मागील अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यातआ.संजयमामा शिंदे गटाला गळतीचे सत्र सुरू असून पुढील आठवड्यात शिंदे व पाटील गटातून महायुतीला साथ देणाऱ्यांचे मोठे प्रवेश होणार असल्याची माहिती बागल यांच्या कडून देण्यात आली आहे.
यावेळी राजुरी येथील प्रवेश केलेल्या सर्वांनी सांगितले की भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांना राजुरी गावांमधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ,अजित झांझूर्ने,काशीनाथ काकडे,गणेश झोळ,राजेंद्र मोहोळकर,साधनाताई खरात, सतीश झोळ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…