Categories: करमाळा

करमाळा विधानसभा मतदारसंघात चौघांमध्ये होणार काटे की टक्कर


करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता काटे की टक्कर पाहायला मिळणार असून तब्बल उमेदवार रिंगणात उभे राहिले असले तरी प्रत्यक्षात चौरंगी लढत होणार असल्याची चित्र स्पष्ट झालेले आहे आज उमेदवारी अर्ज माघारी करण्याचा आखरी दिवस असताना एकतीस उमेदवारापैकी16 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. 31 उमेदवाराच्या 39 अर्ज प्रत्यक्षात मंजूर झाले होते .काही उमेदवारांचे दुपार अर्ज ही मंजूर झाले होते आज सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज माघार घेण्या साठी अनेक उमेदवारांनी तहसील कार्यालयात धाव घेतली होती. करमाळा विधानसभा मतदारसंघातील 31 पैकी 16 उमेदवारांची माघार व 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार यादी पुढील प्रमाणे
निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार
विकास आलदर (राष्ट्रीय समाज पक्ष), शहाजहान शेख (बहुजन समाज पार्टी), अतुल खूपसे (अपक्ष), सुहास ओहोळ (अपक्ष), बाळासाहेब वळेकर (अपक्ष), उदयसिंह देशमुख (जरांगे समर्थक), संजय शिंदे (अपक्ष), डॉ. सुजित शिंदे (अपक्ष), दत्तात्रय शिंदे (अपक्ष), पोपट पाटील (अपक्ष), सागर लोकरे, जितेंद्र गायकवाड (अपक्ष), संभाजी भोसले (अपक्ष)
निवडणुकीत उभे असलेले उमेदवार
नारायण पाटील ([महाविकास आघाडी] शरदचंद्र पवार गट), विद्यमान आमदार संजयमामा शिंदे (अपक्ष), दिग्विजय बागल ([महायुती] शिवसेना शिंदे गट), रामदास झोळ (अपक्ष), सिद्धार्थ वाघमारे (अपक्ष), जमीर शेख, जालिंदर कांबळे, धीरज कोळेकर, गणेश भानवसे, मधुकर मिसाळ, विनोद सीतापुरे, संजय शिंदे (बहुजन समाज पार्टी), अशोक वाघमोडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), अभिमन्यू अवचर (अपक्ष), संजय शिंदे (अपक्ष
31 उमेदवारापैकी 16 जणांनी माघार घेतली असुन एकुण 15 उमेदवार‌ निवडणुक रिंगणात उभे आहेत असे असले तरी करमाळा विधानसभा मतदार संघामध्ये यंदा प्रमुख चार उमेदवारामध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे.यामध्ये विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अपक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेना शिंदे गटाकडुन मकाईचे सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल अपक्ष म्हणुन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर या चौघांमध्ये विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे.राष्ट्रवादी शिवसेना अपक्षामध्ये ही निवडणुक होणार आहे.मतदार राजा नक्की कुणाला कौल देऊन निवडून देणार हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago