.
करमाळा प्रतिनिधी
244 करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मराठा सेवा संघाचे तालुका माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सुजितकुमार काशिनाथ शिंदे यांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा आदेश प्रमाण मानून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन मराठा मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला तसेच सुहास शिवमुर्ती ओहोळ यांनीही आपला अर्ज माघारी घेऊन आमदार संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना डॉक्टर सुजितकुमार शिंदे व सुहास ओहोळ म्हणाले की आमदार संजयमामा शिंदे हे विकासप्रिय आमदार आहेत त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश प्रमाण मानून आपण हा निर्णय घेतला असून फक्त पाठिंबा देण्यापुरते आम्ही मर्यादित राहणार नसून आमदार शिंदे यांचा जाहीर प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठीही 24 तास प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉक्टर सुजितकुमार शिंदे, श्री सुहास ओहोळ या उमेदवारांबरोबरच प्रवीण पाटील ,सुजित बागल, तात्या पाटील, पै. अनिल पवार, गौतम ढाणे, सतीश पाटील ,किसन पिंपरे, सोमा लांडे, बबन चोरमले, भाऊ साहेब शेळके, पैलवान अमोल गायकवाड, दिलीप बागल, नानासाहेब नलावडे, युवराज गपाट, मनोहर रंदवे, आबासाहेब ननवरे, अभिजीत ननावरे, अमोल चाळक, महेश काळे, विनय ननवरे, आजिनाथ मोरे, दिगंबर झिंजाडे आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…