करमाळा प्रतिनिधी
महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबर बागल यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे येत असून दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांची भव्य सभा होणार असून या सभेला करमाळा विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांनी व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.अत्यंत राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद लावून निवडणूक प्रतिष्ठितेची केली आहे.याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अकरा वाजता सोलापूर विमानतळावर येणार असून तेथून हेलिकॉप्टरने करमाळा येथे येणार आहेत त्यांची बारा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून या सभेनंतर पुढे त्यांच्या परंडा बार्शी धाराशिव उमरगा अशा चार सभा आहेत.ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल शिवसेनेचे समन्वयक विलासराव घुमरे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे ,ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश करचे शहरप्रमुख संजय शिलवंत महिला आघाडी नेत्या पद्मजा इंगवले उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे,युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड ,उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे ,बाळासाहेब वाघ ,दादासाहेब तनपुरे वैद्यकीय सहाय्यक दीपक पाटणे नागेश चेंडगे कुर्डूवाडी शहर प्रमुख समाधान दास महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामीरोहित बलाक्षी सागर कोल्हे अनिता पवार आदी शेकडो पदाधिकारी परिश्रम घेत आहेतयाशिवाय भाजप आरपीआय रयत शेतकरी संघटनाअजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…