करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील राजकारण शिकलं की पुर्ण राज्यातलं राजकारण कळत , कारण राजकारणातील विद्यापीठ म्हणजे हा करमाळा तालुका आहे. ज्या विश्वासाने तुम्ही प्रवेश केला , त्याला तडा जाऊ न देता भविष्यात सर्वोतोपरी मदत केली जाईल ,आपल्याला जे राजकारण करायचेच आहे ते प्रगतीचे , विश्वासाचे व विकासाचे करायचं आहे , असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.
बुधवारी ६ रोजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कोर्टी जिल्हा परिषद गटातील झरे , अंजनडोह , विहाळ, मोरवड, पोंधवडी , राजुरी, सावडी, कुंभारगांव , घरतवाडी , देलवडी , कोर्टी या गावांमध्ये प्रचार दौरा केला .सायंकाळी कोर्टी येथे जाहीर सभा घेण्यात आली . या सभेत कोर्टी येथील पैलवान रवींद्र उर्फ आप्पासाहेब शेरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला. याचबरोबर हिंगणी चे माजी सरपंच हनुमंत पाटील , तानाजी बाबर , संजय बाबर , दिव्हेगव्हाणचे माजी सरपंच मोहन खाटमोडे , मांजरगांवचे मधुकर चव्हाण , चंद्रकांत पोळे , पै. पवन चव्हाण , तात्यासाहेब मोरे , श्रीनिवास पाटील , दशरथ चव्हाण , कोर्टीचे ग्रामपंचायत सदस्य मनोज मिडे व संगम ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला . यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती .
यावेळी चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे , मकाईचे माजी संचालक सुर्यकांत पाटील , चंद्रहास निमगिरे , माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी , नितीन राजेभोसले , विलासदादा पाटील , निळकंठ अभंग , ॲड . अजित विघ्ने , विवेक येवले , आप्पासाहेब मंजुळे , सरपंच तानाजी झोळ , आशिष गायकवाड , सतिश शेळके , झरेचे सरपंच प्रशांत पाटील , कन्हेरगांव चे धनंजय मोरे , सुभाष अभंग , अक्षय गायकवाड , सरपंच किरण फुंदे , सुजित बागल , गौरव झाझुंर्णे , बाळकृष्ण सोनवणे , ऋषांत कानतोडे पाटील , बंडूपंत पानसरे , शितल क्षिरसागर , बाबु खुळे , अनिल शेजाळ , साधु तानवडे , राजेंद्र बाबर , तात्या सरडे , बाळुभाई शेख , उदय शेळके , भोजराज सुरवसे , दत्तात्रय अडसूळ , अनिल केकाण , तात्या पाटील , सुहास ओहोळ , बापू तांबे , सुहास गलांडे , इक्बाल इनामदार , सरपंच भाऊसाहेब शेळके , राजकुमार देशमुख , अमित गिरंजे , बबनराव जाधव , उपसरपंच शिवाजी कोकरे , सरपंच मनोहर हंडाळ , दयानंद मारकड , सुनिल ढवळे , ॲड . अमित गिरंजे , दादासाहेब खरात , अशपाक जमादार , डॉ . गोरख गुळवे , श्रीपाद दळवी , गौतम ढाणे , संजय सारंगकर , आप्पासाहेब खाटमोडे , शहाजी झिंजाडे उपस्थित होते .
यावेळी चंद्रकांत सरडे , सुर्यकांत पाटील , नितीन राजेभोसले , ॲड. अजित विघ्ने , नंदकुमार जगताप , गौरव झाझुंर्णे , निळकंठ अभंग , अनिल शेजाळ , शिवाजी कोकरे , राजेंद्र बाबर , गौतम ढाणे यांनी मनोगत व्यक्त केले .बुधवारी दिवसभर झालेल्या प्रचार दौर्यात आमदार संजयमामा शिंदे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले .
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…