Categories: करमाळा

करमाळा तालुक्याचा ‌ सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही तर विकासासाठी ‌भूमिपुत्र म्हणून मला एक वेळ आमदार म्हणून निवडून देऊन काम ‌करण्याची संधी द्यावी -प्रा.रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा ‌ सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही, तर ‌शिक्षण, आरोग्य, ‌ उद्योग, रोजगारनिर्मिती, विकासासाठी ‌”भूमिपुत्र” म्हणून मला एक वेळ निवडून देऊन, काम ‌करण्याची संधी द्यावी. असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील जाहीर सभेत व्यक्त केले‌ आहे . यावेळी व्यासपीठावर “बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे” अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, पोफळज गावचे संभाजी शिंदे, प्रा. रामदास झोळ सर यांचे वडील मधुकर झोळ बंधू, अनुरथ झोळ, पांडुरंग झोळ‌, सासरे लालासाहेब जगताप सर, सौ मायाताई झोळ मॅडम,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, रिपब्लिकन पार्टीचे नेते यशवंतराव गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, ह.भ.प कल्याण खाटमोडे, श्रीकांत साखरे पाटील ‌उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी ‍ही कामे लोकप्रतिनिधीला करावीच लागतात. परंतु याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगार ही प्रश्न मार्गी लावणे, लोकप्रतिनिधीचे काम असते. करमाळा तालुक्यातील गावांमधील रस्ते, पाण्याबाबत प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे. तो प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच शिक्षण व रोजगार निर्मितीसाठी देवळाली येथे शिक्षण संकुलाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करणार आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी भव्य नोकरी महोत्सवाच्या आयोजन करून युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीतही करमाळा तालुका मागास असून सर्व सोयींनी युक्त, तज्ञ डॉक्टरांना बरोबर घेऊन प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्यावतीने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सवलतीच्या दरामध्ये सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यात मध्ये सर्वात जास्त निधी दिला असे विद्यमान आमदार म्हणत आहेत आणि इकडे ३६ गावांमध्ये आल्यानंतर येथे सर्वाधिक निधी दिला अशी सांगत आहेत. परंतु सगळीकडे रस्ते, पाणी, वीज, आरोग्याबाबत प्रश्न जशास तसेच आहेत. मग ३००० कोटीचा निधी गेला कुठे? हा प्रश्न जनतेने विचारणे गरजेचे आहे. करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच मकाई, कमलाई, भैरवनाथ या कारखान्याकडे अडकलेली ३० कोटी रुपयांची बिले आंदोलन करून आम्ही मिळवून दिली आहेत. शेतकऱ्यांच्या खिशाला एक रुपयाची झळ न लागू देता स्वतः न्यायालयीन लढून न्याय मिळून दिला आहे. म्हैसगाव येथील विठ्ठल शुगर्स कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवण्यास दिला असून या कारखान्याकडे अडकलेली बिले सभासद रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून १०० कोटी रुपये त्यांना देण्यास भाग पाडले आहे .मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून सर्व घटकांना, बहुजन बांधवांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करून मुलींचे शिक्षण मोफत करण्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांनाही इतर समाजाप्रमाणे वस्तीगृह भत्ता मिळून दिला आहे. धनगर समाजालाही एसटी आरक्षणाप्रमाणे सर्व लाभ मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून मागणी केली. तोही शासन निर्णय झाला आहे. मनोज जरांगे-पाटील हे सर्व समाजाचे कल्याण करणारे नेते असल्यामुळे त्यांचे कार्य सर्वसामावेशक असल्यामुळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली समर्थनार्थ विधानसभेची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे .करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असून कालवा समितीमध्ये शासनाचे अधिकृत नियंत्रण असण्यासाठी आपण आग्रही आहोत. आपल्या हक्काचे पाणी आपणास मिळाले पाहिजे याकरिता समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ‌‍पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करमाळा तालुक्यात केळी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे केळी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षणाची सोय करून एमआयडीसी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करून स्वयंरोजगार मिळून देणार असल्याने मला *रिक्षा* चिन्हावर बटन दाबून एक वेळ आमदार म्हणून निवडून ‍देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. या जाहिर सभेत माजी आमदार नारायण आबा पाटील गटातुन कोढारचिंचोलीचे मातंग आघाडीचे भरत लांडगे, अनिल डफळे, मनोज साळुंखे, सागर गलांडे, अनिल गजरमल यांच्या समवेत १०० कार्यकर्त्यांनी झोळ परिवारात प्रवेश केला आहे. तसेच बागल गटातुन भिलारवाडीचे उपसरपंच परमेश्वर गिंरजे यांनी आपल्या सहकार्यासह प्रवेश करून प्रा. रामदास झोळ सर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रा. रामदास झोळ सर यांचे काम नक्कीच प्रेरणादायी असल्याने आम्ही कुर्डूवाडी सह ३६ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे .एक सुशिक्षित, अभ्यासू, सुसंस्कत, नेतृत्वाची विकासासाठी गरज असल्याने कुर्डूवाडी सह ३६ गावामधून त्यांना मताधिक्य मिळून घेऊन निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमीच प्रस्थापितच्या विरोधात उभा राहुन परिवर्तनाचे काम केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदारांना धक्का देऊन झोळ सरांना निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे म्हणाले की, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने कुठल्याही नेते मंडळीचे सहकार्य न घेता भिगवणसारख्या ठिकाणी उजाड माळरानावर पाच हजार विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्यासाठी मोठे शैक्षणिक संकुल उभे केले आहे . करमाळा तालुक्याचे माजी आमदार स्व. रावसाहेब पाटील यांच्यानंतर बॅकवॉटर भागातील वाशिंबे गावचे भूमिपुत्र असलेले, विकासाचा दृष्टिकोन असलेले, उच्चशिक्षित ,सुसंस्कृत अभ्यासू, प्रामाणिक, सामाजिक भान असलेले हे नेतृत्व असून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देण्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग याचबरोबर करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या बॅक वॉटर भागातील नेत्याला आमदार करण्याची संधी आपणास मिळाली असून प्रा. रामदास झोळ सरांना निवडून देण्याचे आवाहन बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी केले आहे. या सभेचे प्रास्ताविक स्वागत श्रीकांत साखरे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवले सर यांनी केले. तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले. ‌या सभेला शेतकरी, युवक, महिला, नागरिक ‌ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट* – करमाळा तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी विकासाच्या नावाखाली ‌जनतेला ‌ नुसत्या ‌भुलथापा मारून स्वतःचा विकास करण्याचे काम केले आहे. विकास नक्की कोणाचा झाला. याचा विचार सुज्ञ नागरिकांनी, जनतेने करून भुमिपुत्र, सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रामाणिक असणाऱ्या ‌ प्रा. रामदास झोळ सरांना ‌बहुमतानी एक वेळ निवडून द्यावे. ते नक्कीच करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

9 hours ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

3 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago