करमाळा प्रतिनिधी शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना विजयी करुन महायुतीला साथ द्या करमाळा तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावुन सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले .करमाळा येथे करमाळा विधानसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल, माढा विधानसभा उमेदवार मिनलताई साठे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल,मा.आमदार शामलताई बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, मंगेश चिवटे, सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे ,मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर ,बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप मकाईचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे,नानासाहेब लोकरे, आदिनाथ कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन आण्णा रमेश कांबळे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,युवा प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर संजय घोरपडे, जितेश कटारिया आर पी आयचे अर्जुनराव गाडे बाळासाहेब टकले ,युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातुन दिग्विजय बागल शिवसेना भाजप महायुतीकडून उभे असून त्यांच्या नावात दिग्विजय आहे त्यांचा विजय निश्चित असून शिवसेना महायुती घटक पक्षांनी दिग्विजय बागल यांना बहुमताने निवडून देऊन आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी.दिग्विजय तु चिंता करू नकोस एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे. मी ज्यावेळी एखाद्याला ताकद देतो ती पुर्ण व कायम देतो. त्यामुळे करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना एमआयडीसी,आदिनाथ सहकारी कारखाना,मकाई सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक मदत करून सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीतही आम्ही अत्याधुनिक पद्धतीचे सर्वसोयींनीयुक्त हॉस्पिटल उभा करणार आहोत. करमाळा माढा मतदारसंघातील छत्तीस गावांमधील माया माऊलीचा लाडकी बहीणीचा यांचा आशीर्वाद दिग्विजय याच्या पाठीशी आहे . महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेचा खोटा प्रचार करून खोटे नरेटीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत त्यांना त्याचा फायदा झाला. परंतु आता जनता हुशार झाली असून त्यांना हे समजले आहे की हा खोटा नरेटीव होता म्हणून त्यांनीच आता लाडक्या बहिणीसाठी आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले एकीकडे पंधराशे रुपये देऊन सरकारी तिजोरीवर 46000 कोटीचा बोजा पडत असल्याचे ते सांगत होते मग ते 92 हजार कोटी रुपये कुठून आणणार हे आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे त्यामुळे आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. मात्र सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी आम्ही जी कामे केली आहेत. जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.त्याची जाण ठेवून सर्वांनी विचार करून धनुष्यबाणाचे बटन दाबून आम्हाला विजयी करावे . आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तर दीड हजार ऐवजी 2100 रुपये घेण्यात येणार आहे. अंगणवाडी शिक्षकाचा पगार 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना साडेबारा ऐवजी 15000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकाला टीका करण्यासाठी कुठलाही मुद्दा राहिला नाही गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे हित जपणारी हे सरकार असून महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातूनही आम्ही 424 कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी दिले आहेत. तर सिंचनासाठी भरघोस निधी दिला असून शेतकरी युवक महिला सर्वसामान्य नागरिकाचे भले करण्याचे काम या सरकारने केले असून रस्ते ,पाणी, वीज उद्योग ,रोजगार सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या हितासाठी कल्याणसाठी महायुतीचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना यांन प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.या जाहीर सभेसाठी शेतकरी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट दिग्विजय बागल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले डिगा मामाचा मुलगा म्हणून ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. दिगंबरराव बागल डिगा मामाचा मुलगा म्हणून मला एक वेळ आमदार म्हणून आपण आशीर्वाद द्यावा .स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या निधनानंतर अठरा वर्षांनी त्यांचा मुलगा म्हणून एकदाच मी तुम्हाला मत रुपी आशीर्वाद मागत आहे. एक वेळ मला आमदार म्हणून निवडून द्या करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून दिलेल्या संधीचे नक्कीच मी सोने करून दाखवीन असा विश्वास करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला आहे.* *हिंदू मुस्लिम महिलांनी लाडकी बहीण योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लाडका भाऊराया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण केले आहे.