करमाळा प्रतिनिधी
2019 ते 24 या पंचवार्षिक मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेल्या विकास कामामुळे विरोधक भांबावून गेलेले आहेत. विधानसभेची निवडणूक विकास कामांचा मुद्दा सोडून भरकटवली जात आहे.मामांनी दिलेल्या 3490 कोटीच्या विकास कामांची चेष्टा उडवणे व अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे हे गलिच्छ राजकारण विरोधकांनी सुरू केले असून आ.संजयमामा शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते गट सोडणार आहेत अशा वावड्या उठवून मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम विरोधकांनी सुरू केले असून विरोधकांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. मला कापले तरी मी संजयमामांचा गट सोडणार नाही असे रोखठोक प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चिखलठाण चे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे यांनी केले.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ,जेऊर – चिखलठाण -कुगांव या 16 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 16 कोटी रुपये मंजूर करून एक महिन्यात रस्ता पूर्ण केल्यामुळे तसेच कुगांव ते शिरसोडी या नदीवरच्या पुलासाठी 395 कोटी निधी मंजूर करून सदर कामाचे भूमिपूजन करून काम चालू झालेले आहे . त्यामुळे आमच्या भागातील शेतकरीवर्ग मामांच्या कार्यपद्धतीवर खुश आहे .करमाळा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने तालुक्याला गरज आहे . माझ्याविषयी मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू होती , परंतु मला कापले तरी मी आमदार शिंदे यांचा गट सोडून कुठेही जाणार नाही . मामांना परत एकदा निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करून चिखलठाण परिसरातून मोठं मताधिक्य मिळवून देणार असुन तालुक्यातील मतदारांनी सुध्दा आपले मत वाया न जाऊ देता सफरचंदाच्या चिन्हावर मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…