करमाळा (प्रतिनिधी )२४४, करमाळा विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि २०१४,२०१९ प्रमाणेच करमाळा विधानसभेत पुर्वीचेच पारंपारिक प्रतिस्पर्धी संजयमामा शिंदे गट , बागल गट आणि पाटील गटात फाईट होत आहे . अपक्ष म्हणुन पुन्हा एकदा आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे स्पष्टपणे दिसुन येते असे मत ॲड अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे.याव्यतिरिक्त महायुतीतर्फे शिंदेंच्या शिवसेनेतून दिग्विजय बागल यांना आपली उमेदवारी शेवटच्या क्षणी घोषित करून बागल गटात नवचैतन्य उभारले असुन माजी आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची व महायुतीची साथ लोकसभेपूर्वीच सोडुन राष्ट्रवादी शरदपवार पक्षाशी सलगी करून करमाळ्यातील पुढाऱ्यांची जमवाजमव केल्याचे दिसते. करमाळ्यातील नविन नवखे अपक्ष उमेदवार रामदास झोळ सर यांनी देखिल गेली सहा सात महिन्यापासुन विधानसभेला उभे रहाण्याची तयारी चालु केली होती व जरांगे पाटलांचा पाठींबा असेल तर विधानसभा लढवु असे वक्तव्य केले होते . परंतु जरांगे पाटलांनी करमाळ्यात उमेदवारी घोषित न करतात संपुर्ण राज्यातच निवडणुकीतुन माघार घेतली आहे . अशा परिस्थितीत रामदास झोळ यांनी अपक्ष दावेदारी करीत निवडणुकीत रंगत भरलेली दिसुन येते. चौरंगी लढतीत करमाळाच्या ११८ गावातून प्रमुख तीन आणि ९ इतर उमेदवार अर्ज कायम ठेवले असुन ३६ गावातून तीन उमेदवारी अर्ज राहीले आहेत .सध्याची परिस्थिती पाहता आमदार संजयमामा शिंदे यांना ११८ गावातूनही प्रचंड पाठींबा मिळताना दिसत असुन करमाळ्यातूनच त्यांना विक्रमी आघाडी मिळेल असे स्पष्ट चित्र दिसुन येत आहे. एकीकडे भाजपाचे मुख्य नेतेमंडळी उघडपणे आमदार संजयमामा शिंदे यांचा प्रचार करीत असुन या व्यतिरिक्त मनसे, रिपाइ व अनेक संघटनांचा पाठींबा जाहीरपणे मिळत आहे .भले पक्षाने कट्टर कार्यकर्त्यांवर पक्षविरोधी कारवाई करण्याचे आदेश देऊनही कार्यकर्ते मामांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी माजी आमदार नारायण ( आबा ) पाटील यांची यावेळी साथ देण्याचा निर्णय त्यांचेच जवळचे कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नसुन उघडपणे असे अनेक कार्यकर्ते आमदार संजयमामां बरोबर असल्याचे दिसुन येत आहे. माजी आमदार जयवंतरावांनी तर कंदरमधे स्वतःचेच कार्यकर्त्या वर टिका टिप्पणी करून खरेदी विक्री संघाचा राजीनामा देण्यास सांगितले असता कंदर येथील कार्यकर्ते व मार्केट कमिटी संचालक असणारे आण्णा पवार यांनी नारायण पाटलांची साथ मी कदापी करणार नाही म्हणत आज डायरेक्ट स्वतः चे पत्नीचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला असुन तसे राजीनाम्याचे पत्र व्हायरल होत आहे . निश्चितच करमाळा तालुक्यातील समीकरण पाहता आमदार संजयमामा शिंदे यांचे पारडे दिवसे दिवस जड होताना दिसुन येत आहे .
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…